Gujarat Drona Desai 498-Run - गुजरातच्या द्रोण देसाईने आंतरशालेय दिवाना बल्लूभाई चषक स्पर्धेत ४९८ धावांची विक्रमी खेळी केली. सेंट झेव्हियर ( लोयोला) शाळेतील विद्यार्थी देसाईने शिवाय क्रिकेट ग्राऊंडवर जेएल इंग्लिश स्कूलविरुद्ध ही विक्रमी खेळली केली. यासह त्याने अनेक स्टार युवा खेळाडूंच्या यादीत नाव समाविष्ठ केले. देसाईने ३२० चेंडूंचा सामना करताना ७ षटकार व ८६ चौकार खेचले आहेत.
देसाई ५०० धावांच्या जवळ पोहोचला होता, परंतु दोन धावांनी त्याचे हे विक्रम हुकला. ''मैदानावर कोणतंच धावफलक नव्हतं आणि मी ४९८ धावांवर खेळतोय, हे माझ्या संघानेही मला कळवले नाही. मी माझा फटका मारला आणि आऊट झालो, परंतु मी या खेळीने आनंदी आहे,''असे देसाईने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.
देसाईच्या ४९८ धावांच्या खेळीच्या जोरावर सेंट झेव्हियर संघआने ७१२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. जेएल इंग्लिश स्कूलला संपूर्ण सामना १० खेळाडूंसह खेळावा लागला. देसाईने गुजरातच्या १४ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि त्याला आता १९ वर्षांखालील संघात संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.
''सात वर्षांचा असताना मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि माझ्या वडिलांनी मला त्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी मला जेपी सरांकडे नेले आणि त्यांनी ४० हून अधिक क्रिकेटपटूंना घडवले आहे,''असे त्याने सांगितले. आठ वर्षांपूर्वी मुंबईच्या प्रणव धनावडेने आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत १००० धावा करून नाव कमावले होते आणि हा शालेय क्रिकेटमधील वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
प्रणव धनावडे - १००० धावा
पृथ्वी शॉ - ५४६ धावा
डॉ. हवेवाला - ५१५ धावा
चमनलाल - नाबाद ५०६ धावा
अरमान जाफर - ४९८ धावा
द्रोण देसाई - ४९८ धावा
गुजरातचा राहणारा द्रोण देसाई युवा क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करतोय. त्याने यापूर्वी १४ वर्षांखालील स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केले होते. त्याचा क्रिकेटमधील प्रवास वयाच्या सातव्या वर्षी सुरू झाला, तो सचिन तेंडुलकरची बॅटींग पाहून खूप प्रभावित झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.