Hardik Pandya in Anant Ambani wedding sakal
क्रिकेट

Hardik Pandya Video : अनंत अंबानींच्या लग्नात हार्दिक पांड्याचं विमान ढगात? वेटर सोबत बोलतानाचा 'तो' Unseen व्हिडीओ व्हायरल

Kiran Mahanavar

Hardik Pandya in Anant Ambani Wedding : अखेर 12 जुलै रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह मुंबईत पार पडला. या लग्नाला देश-विदेशातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.

अनंत-राधिकाच्या लग्नाला भारतीय संघातील अनेक खेळाडूंनीही हजेरी आले होते, ज्यामध्ये अष्टपैलू हार्दिक पांड्याचं नावही सामील होतं. हार्दिक त्याचा मोठा भाऊ कृणाल पांड्या आणि त्याची पत्नी पंखुरी शर्मा आणि टीम इंडियातून बाहेर असलेला त्याचा मित्र आणि विकेटकीपर इशान किशनही लग्नाला आला होता.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्ननातील अनेक व्हिडीओ आणि फोटोज व्हायरल होते आहे. यादरम्यान, एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये हार्दिक पांड्या वेटर सोबत बोलत आहे आणि टकीला मागत आहे. मात्र, सोबतचा दुसरा कोणताही व्हिडिओ समोर आला नसल्याने त्याने तो स्वत:साठी ऑर्डर केला होता की अन्य कोणासाठी याची पुष्टी होऊ शकली नाही. व्हिडिओमध्ये हार्दिकच्या मागे बॉलीवूड स्टार्सचा जमाव दिसत आहे, ज्यामध्ये रणबीर कपूर, अर्जुन कपूर आणि कतरिना कैफ देखील दिसत आहेत.

यापूर्वी पीटीआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये पांड्या बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. यापूर्वी हार्दिकने त्याचा मोठा भाऊ, वहिनी आणि ईशानसह संगीत कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

हार्दिक पांड्या आपल्या कुटुंबासह लग्नासाठी पोहोचला होता पण त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविच दिसली नाही. मीडियामध्ये अशा बातम्या येत आहेत की, हार्दिक आणि नताशामध्ये काही ठीक नाही आणि दोघेही लवकरच वेगळे होऊ शकतात. मात्र, अद्याप या प्रकरणी दोन्ही बाजूंनी उघड प्रतिक्रिया आलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lebanon Walkie-Talkies Blast: पेजरनंतर वॉकीटॉकी अन् सौर यंत्रणेत स्फोट! 14 ठार तर 450 जखमी, मोबाईलसुद्धा न वापरण्याचा सल्ला!

अग्रलेख : प्रतिमानिर्मितीचे प्रयोग

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT