Hardik-Pandya-Natasa-Stankovic-Divorce sakal
क्रिकेट

हॅट्स ऑफ पांड्या! वैयक्तिक आयुष्यात 'वादळ' असूनही तू शांत राहिलास अन् देशाला वर्ल्ड कप जिंकून दिलास!

Swadesh Ghanekar

- स्वदेश घाणेकर

जसं दिसतं तसं खरंच नसतं... वर वर सर्व गुडीगुडी दिसणाऱ्या चित्रामागे भयंकर काहीतरी असेल याची कल्पनाही आता करवत नाही... त्यात सेलिब्रेटींचे आयुष्य म्हणजे सर्वच छान छान.. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोव्हिच ( Hardik-Pandya-Natasa-Stankovic) यांचेही आयुष्य असंच स्वप्नवत दिसत होते...

२०२० सालचा पहिला दिवस आठवतो... हार्दिक पांड्याने Yatch वर गुडघ्यावर बसून नताशा स्टँकोव्हिचला केलेलं प्रपोज आठवतं आणि त्यानंतर दोघांचा रोमँटिक Kiss... त्यानंतर राजस्थानमध्ये झालेलं शाही लग्न... ख्रिश्चन पद्धतीनेही केलेलं लग्न... एखाद्या राजकुमारीसाठी जसा थाट असतो तसा थाट नताशा स्टँकोव्हिचचा दिसला होता... पण, आज त्या सर्व स्वप्नातील सुंदर गोष्टींना तडा जाणारी गोष्ट घडली... हार्दिक-नताशा ( Hardik-Natasa-Part-Ways-Mutually-Confirm-Divorce) यांच्या घटस्फोटाची बातमी आदळली आणि चाहत्यांना हे कळुन चुकले की हार्दिक पांड्याच्या आयुष्यात किती मोंठ वादळ सुरू होतं... तरीही तो वादळात शांत राहिला आणि देशाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला...

मुंबईच्या नाईट क्लबमध्ये २०१८ साली हार्दिक व नताशा यांची भेट झाली. एका कॉमन मित्राने ही ओळख करून दिल्यानंतर हार्दिक पाहताच क्षणी नताशाच्या प्रेमात पडला.. तिला पहिल्याच भेटीत हात मिळवण्याएवजी त्याने मिठी मारली.. पेहेले उधर ही भाई फिसल गया... ( हार्दिकचे नताशाला पहिल्या भेटीनंतरचे हे वाक्य होते).. आज त्याचे काय झाले? ( Pandya-Stankovic-Declare-Mutual-Divorce-On-Instagram). त्यानंतर हार्दिक-नताशाच्या भेटी गाठी होत राहिल्या आणि दोघं कधी प्रेमात पडले हे कोणालाच कळले नाही. २०१८ पर्यंत हार्दिकही टीम इंडियात सेटल होत होताच... पण, दुखापतीचे ग्रहण त्याच्या मानगुटीवर होते.. त्यातही नताशा त्याच्या सोबत राहिल्याने, या दोघांची केमिस्ट्री लैय भारी असेच सर्वांना वाटले.

हार्दिक नताशाने त्यांचे प्रेम दोन वर्ष जाहीर केले नव्हते. पण, दो दिल मिल रहे है, मगर चुपके चुपके! शाहरुख खानच्या 'परदेस' चित्रपटासारखी त्यांची कहाणी सुरूच होती. २०२०च्या नववर्षाचा पहिला दिवस उजाडला तो हार्दिक-नताशाच्या एंगेजमेंटच्या बातमीने... दुबईत त्याने केलेल्या घोषणेने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. मग काय कोरोना आला आणि कुटुंबियांनी घरच्या घरी दोघांचे लग्न लावून टाकले.. त्याच वर्षी जुलै महिन्यात नताशा-हार्दिक यांना पूत्रप्राप्ती झाली... अगस्त्याच्या येण्याने ही फॅमिली पूर्ण झाली... त्यात कोरोना काळामुळे थाटात लग्न करता न आल्याची सर हार्दिकने तीन वर्षानंतर 'व्हॅलेंटाईन डे'ला भरून काढली... Pandya-Stankovic-End-Marriage-On-Amicable-Terms

ते राजेशाही लग्न डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. पण, मग असं नेमकं काय घडलं, या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला? या प्रश्नाचे उत्तर ही दोघंच देऊ शकतील. पण, हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाच्या बातम्या मागील अनेक महिन्यांपासून सुरूच होत्या. आयपीएल २०२४ मध्ये ही चर्चा सुरू झाली. तेव्हा वाटलं की हार्दिकला सामोरे जाणाऱ्या रोषाचे रुपांतर सहानभुतीत करण्यासाठी नताशाच्या PR टीमचा हा प्लान असेल. पण, या सर्व जर तर शंकाना आज फाटा गेला... ते सर्व खरं होतं, यावर शिक्कामोर्तब झाले... Pandya-Stankovic-Take-Mutual-Decision-To-Separate

पण, हे हार्दिकला माहित होते आणि तो कोणत्या मानसिक स्थितीतून जात होता, याचा विचार करूनही हार्दिकबाबत प्रेम अधिक वाढलं... आपल्या मनासारखी एखादी साधी गोष्ट जरी झाली नाही, तरी आपली प्रचंड चिडचिड होते. त्यात जिच्यावर प्रेम केलं तिच्यापासून दूर जाण्याचं टेंशन घेऊन हार्दिक ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत मैदानावर उतरला... पर्सनल गोष्टी या ऑफिसच्या बाहेर ठेवायच्या, हा नियम त्याने पाळला खरा. पण, ही आयुष्यातील खूप मोठी व धक्का देणारी गोष्ट होती. त्याचा मानसिक ताण किती असेल हे हार्दिकच सांगू शकेल... वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान नताशासोबतच्या घटस्फोटाची बातमी समोर आली.. अशा परिस्थितीत हार्दिकच्या कामगिरीवर परिणाम झाला असता, पण तो खंबीर राहिला. देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरला... एकाच वेळी तो वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात लढा देत होता..

त्याची वैयक्तिक आयुष्यात हार झाली असे आता तरी वाटत असले तरी तो यापुढे आयुष्यात बरंच काही यश मिळवेल, अशी चाहत्यांना आशा नक्की आहे. दक्षिण आफ्रिकेला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत शेवटच्या षटकात पराभूत केल्यानंतर हार्दिक पांड्या एवढा का रडला, याचे उत्तर आज मिळाले. वर्ल्ड कप विजयाचा आनंद त्याला होताच, परंतु त्याचवेळी वैयक्तिक आयुष्यातील दुःखाला त्याने खऱ्या अर्थाने वाट मोकळी करून दिली होती. लहानपणापासून हार्दिकने संघर्ष पाहिला आहे. आज घटस्फोटाची बातमी समोर येण्यापूर्वी त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपद होण्याची संधी हुकली... इतकेच नाही तर त्याचे उप कर्णधारपदही गेलेय... तरीही हार्दिक मोठ्या हिमतीने उभा राहील आणि जिंदादिल माणसासारखा जगेल, यात शंकाच नाही. Hardik-Pandya-Natasa-Stankovic-Divorce-Confirmed-By-Both

शेवटी हेच म्हणावसं वाटतंय... हॅट्स ऑफ पांड्या!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra : 1cm ने हुकलो! नीरज चोप्राच्या हातातून थोडक्यात 'Diamond' निसटला; पठ्ठ्याने जेतेपदासाठी पूर्ण जोर लावला

Neeraj Chopra ने 0.01m च्या फरकाने जेतेपद गमावले; पण, Prize Money म्हणून वाचा किती कमावले...

UP Building Collapsed: उत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली; 8-10 जण अडकले

Duleep Trophy 2024: तिलक वर्मा-प्रथम सिंग यांची शानदार शतके; भारत अ संघाला विजयाची संधी

Crime: भांडुप हादरलं! बोलण्यास नकार; युवक संतापला, रागात महिलेवर चाकूने वार, नंतर स्वत:चा चिरला गळा

SCROLL FOR NEXT