Hardik Pandya | Team India | IND vs BAN 1st T20I Sakal
क्रिकेट

Hardik Pandya चा नो लूक शॉट! भाईने मनगटाच्या जोरावर चेंडू पाठवला बांऊंड्री लाईन बाहेर

Pranali Kodre

India vs Bangladesh, 1st T20I: भारतीय क्रिकेट संघाने रविवारी बांगलादेशविरुद्ध ग्वाल्हेरला झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला. या विजयात हार्दिक पांड्यानेही मोलाचा वाटा उचलला. त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागात योगदान दिलं. दरम्यान, या सामन्यात त्याने खेळलेला नो-लूक शॉट चर्चेचा विषय ठरला.

झाले असे की बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी १२८ धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला विजयासाठी ५२ चेंडूत केवळ १० धावांची गरज होती, तेव्हा हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डी चौथ्या विकेटसाठी भागीदारी करत होते.

यावेळी १२ व्या षटकात तस्किन अहमद गोलंदाजीसाठी आला. त्याने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूवर हार्दिकने न पाहाताच फक्त मनगटाच्या मदतीने बॅट हलकी फिरवली. त्यावर चेंडू त्याच्या बॅटवर आदळला आणि मागे सीमापार गेला. त्याचा हा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, या सामन्यात हार्दिकने भारताकडून सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली. त्याने १६ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ३९ धावा केल्या. तसेच कर्णधार सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांनी प्रत्येकी २९ धावा केल्या.

अभिषेक शर्माने १६ धावा केल्या, तर नितीश कुमार रेड्डी १६ धावांवर नाबाद राहिला. भारताने १२८ धावांचे लक्ष्य ११.५ षटकातच ३ विकेट्स गमावत पूर्ण केले. बांगलादेशकडून मुस्तफिजुर रेहमान आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

तत्पुर्वी बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना १९.५ षटकात सर्वबाद १२७ धावा केल्या. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली. तसेच कर्णधार नजमुल हुसैन शांतोने २७ धावांची खेळी केली.

या दोघांव्यतिरिक्त कोणालाही २५ धावांचाही टप्पा पार करता आला नाही. भारताकडून अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच हार्दिक पांड्या, मयंक यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Crime Against Dalits: गहू चोरल्याच्या आरोपावरून तीन दलित अल्पवयीन मुलांची काढली धिंड; आरोपींना अटक

IND vs AUS : इंडियाला धक्का; रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन सामन्यांना मुकणार, कारण...

Cabinet Meeting: नॉन क्रिमिलेयरची मर्यादा, पत्रकारांसाठी महामंडळ... मंत्रिमंडळ बैठकीत 38 मोठे निर्णय

Manoj Jarange Video: तुम्ही पिता का हो? जरांगेंना थेट प्रश्न, उत्तरही धमाकेदार; जरांगे पाटलांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत

SCROLL FOR NEXT