Hardik Pandya Instagram Story ESakal
क्रिकेट

Hardik Pandya मुंबई इंडियन्सची साथ सोडणार? आयपीएल रिटेंशनआधी दिले मोठे संकेत

Hardik Pandya Instagram Story: हार्दिक पांड्या लवकरच एक मोठी घोषणा करणार आहे. असं त्याने एका पोस्टमध्ये लिहिलं आहे.

Vrushal Karmarkar

Hardik Pandya Instagram Story: आयपीएलच्या रिटेंशनची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशा स्टार क्रिकेटपटूंबद्दलच्या अटकळी वाढत आहेत. रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार का? कोलकाता नाईट रायडर्स श्रेयस अय्यरला कायम ठेवणार? महेंद्रसिंग धोनी अनकॅप्ड खेळाडू म्हणून चेन्नई सुपर किंग्जमध्ये राहतील का? अशा चर्चा सध्या होत आहे. तर दुसरीकडे आता हार्दिक पांड्याने एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. यावरून आता यंदाच्या आयपीएलमध्ये तो मुंबईला सोडू शकतो अशा चर्चांना उधाण आले. याचे संकेत खुद्द हार्दिक पांड्याने त्याच्या या पोस्टमधून दिले आहेत.

मागील वर्षी गुजरातची साथ सोडून हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. इतकेच नाही रोहित शर्माच्या जागी त्याला संघाचा कर्णधारही बनवण्यात आले. यानंतर त्याच्यावर जोरदार टीका झाली. तसेच हार्दिकच्या वैयक्तिक आयुष्यातही वादळ आले. हार्दिकने पत्नी नताशा स्टॅनकोविचसोबत घटस्फोट घेतला. अशातच हार्दिकच्या एका पोस्टवरून आता खळबळ उडाली आहे.

हार्दिकने शुक्रवारी त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सरावाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात हार्दिकने लिहिले की, सराव परिपूर्ण बनवतो. यानंतर हार्दिकने आणखी एक गोष्ट सांगितली. त्यात म्हटले आहे, 'मी एक मोठी घोषणा करणार आहे. सर्वांना लवकरच कळेल... तेव्हापासून हार्दिक काय घोषणा करणार आहे? याबाबत जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

तो मुंबई इंडियन्सची साथ सोडण्याविषयी बोलत असावा. तसेच याचेच संकेत त्याने दिले आहेत. हार्दिक सोशल मीडियावर याची घोषणा करू शकतो, असा अंदाज नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे. तर काही नेटकऱ्यांचे म्हणणं आहे तो पुन्हा प्रेमात पडला आहे, तसेच लवकरच तो त्याच्या नव्या नात्याबद्दल खुलासा करणार आहे. नताशानंतर हार्दिकच्या आयुष्यात कोणीतरी आले आहे का? असा सवाल नेटकऱ्यांना पडला आहे. मात्र या सर्व चर्चांना येणारा काळच पूर्णविराम देईल. कारण हार्दिकने याबाबत घोषणा करताच त्याच्या या पोस्टचा अर्थ कळू शकेल. याकडे आता सर्वांची नजर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Candidates : मुंबईतील इच्छुक मराठा उमेदवारांची यादी आली समोर; मनोज जरांगे शिक्कामोर्तब करणार का?

लग्नाला 20 वर्षं उलटूनही पंकज त्रिपाठींच्या आईने सुनेला स्वीकारलं नाही ; 'हे' आहे कारण

Sports Bulletin 25th October: भारताला वाचवण्यासाठी वॉशिंग्टन सुंदरचे प्रयत्न ते आयपीएल लिलावापूर्वी मोठ्या घडामोडींचे संकेत

Diwali Recipe : दिवाळीची स्वच्छता करताना काही रहायला नकोय, तुम्ही घरातील या ठिकाणांची स्वच्छता केली का?

Latest Maharashtra News Updates Live : कुजलेले काजू, सुकामेव्याचा वापर करून मिठाई बनवणाऱ्यांवर कारवाई

SCROLL FOR NEXT