ICC Player Of The Month esakal
क्रिकेट

Rohit Sharma : वर्ल्डकपच्या गोल्ड मेडलसोबतच रोहित, बुमराहला आयसीसीकडून मिळणार अजून एक स्पेशल मेडल?

अनिरुद्ध संकपाळ

ICC Player of the Month Rohit Sharma Jasprit Bumrah : भारतीय संघाने टी 20 वर्ल्डकप 2024 वर आपलं नाव कोरलं. भारताने तब्बल 11 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली. भारतीय संघाला फायनल जिंकल्यानंतर ट्रॉफीसोबतच गोल्ड मेडल देखील देण्यात आलं. टीम इंडिया टी 20 वर्ल्डकप सोबत आजच भारतात दाखल झाली.

याचबरोबर आयसीसी भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला अजून एक सुखद धक्का देण्याच्या तयारीत आहे. आयसीसीने नुकतेच प्लेअर ऑफ द मंथचे आपले नॉमिनेशन जाहीर केले. यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाजचा देखील समावेश आहे.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा टी 20 वर्ल्डकप 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 36.71 च्या सरासरी आणि 156.7 च्या स्ट्राईक रेटने 257 धावा केल्या.

जसप्रीत बुमराहने संपूर्ण स्पर्धेत दमदार गोलंदाजी करत भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला. फायनलमध्ये तर त्याच्या गोलंदाजीमुळे टीम इंडियाने जोरदार पुनरागमन केलं. बुमराहने 8.26 च्या सरासरीने अन् फक्त 4.17 च्या इकॉनॉमीने धावा देत 15 विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

Jammu Kashmir Exit Poll Result: हरियाणानंतर जम्मू-काश्मीरमध्येही भाजपला धक्का; काय सांगतो एक्झिट पोलचा अंदाज? वाचा सविस्तर...

IND vs BAN: टीम इंडियाचं ठरलं! अभिषेक शर्मा, संजू सॅमसन ओपनिंग करणार

मेट्रोच्या Aarey To BKC Aqua Line भुयारी सेवेला आजपासून सुरूवात, कसं असेल भाडं आणि वेळापत्रक, जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT