ICC T20 World Cup 2024 warm-up matches
ICC T20 World Cup 2024 warm-up matches sakal
क्रिकेट

T20 World Cup 2024: सुरू झाला टी-20 वर्ल्ड कपचा थरार! वॉर्म-अप मॅचच्या पहिल्या दिवशी 'या' संघांनी मारली बाजी

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 Warm Up Matches: टी-20 वर्ल्ड कप 2024 ची मुख्य स्पर्धा 1 जूनपासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर टी-20 वर्ल्ड कपचे सराव सामने सुरू झाले आहेत. अमेरिका, त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये 27 मे ते 1 जून या कालावधीत सराव सामने खेळवले जाणार आहेत. वर्ल्ड कपपूर्वी एकूण 16 सराव सामने होणार आहेत. सराव सामन्यांच्या पहिल्या दिवशी एकूण 3 सामने खेळले गेले. या सामन्यांमध्ये कॅनडा, ओमान आणि नामिबियाचे संघ विजयी झाले.

टी-20 वर्ल्ड कपच्या सराव सामन्यांच्या पहिल्या दिवशी कॅनडाचा सामना नेपाळशी झाला. जो टेक्सासमधील ग्रँड प्रेरी क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. तर त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीमध्ये ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांच्यातील सामना खेळला गेला.

त्याचवेळी, दिवसाचा तिसरा सामना ब्रायन लारा क्रिकेट अकादमीमध्ये नामिबिया आणि युगांडा संघांमध्ये झाला. कॅनडाने नेपाळविरुद्धचा सामना एकतर्फी 63 धावांनी जिंकला. दुसरीकडे ओमानने पापुआ न्यू गिनीचा 3 गडी राखून पराभव केला. याशिवाय युगांडाला नामिबियाविरुद्ध 5 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.

पहिल्या दिवसाच्या सराव सामन्यांचे निकाल

कॅनडा विरुद्ध नेपाळ

  • कॅनडा - 183/7

  • नेपाळ - 120/10

ओमान विरुद्ध पापुआ न्यू गिनी

  • पापुआ न्यू गिनी - १३७/९

  • ओमान - 141/7

नामिबिया वि युगांडा

  • युगांडा – १३४/८

  • नामिबिया – १३५/५

सराव सामन्यांच्या दुसऱ्या दिवसाचे वेळापत्रक

  • श्रीलंका विरुद्ध नेदरलँड्स, ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियम, ब्रोवर्ड काउंटी, फ्लोरिडा

  • बांगलादेश वि यूएसए, ग्रँड प्रेरी क्रिकेट स्टेडियम, ग्रँड प्रेरी, टेक्सास

  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध नामिबिया, क्वीन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद आणि टोबॅगो

टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात शेवटचा सराव सामना होणार आहे. हा सामना 1 जून रोजी होणार आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran's New President: कट्टरपंथी इराणच्या अध्यक्षपदी पुरोगामी पेझेश्कियान; जाणून घ्या इथून पुढे कसे असणार भारत-इराण संंबंध

Ashadhi Wari : पंढरपुरात राजकीय वातावरण तापलं! राहुल गांधी-शरद पवारांना निंबाळकरांचा विरोध; मोहिते-पाटलांच्या निमंत्रणावरून मोठा वाद

K Armstrong: कोण होते तामिळनाडू बसपा प्रमुख आर्मस्ट्राँग? ज्यांची भररस्त्यात झाली हत्या

Ashadhi Wari 2024 : चांदीच्या मेघडंबरीत विसावली विठुमाउली; नांदेडच्या भाविकाकडून तब्बल 2 कोटी 45 लाखांची चांदी अर्पण

Maharashtra Live News Updates : घड्याळ कुणाचं? 16 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी

SCROLL FOR NEXT