Team India | ICC Women's T20 World Cup 2024 Sakal
क्रिकेट

Women's T20 World Cup 2024: भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने कर्णधार बदलली, निर्णायक सामन्यासाठी असे आहेत 'प्लेइंग-११'

India Women vs Australia Women: महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्याला ऑस्ट्रेलियाची नियमित कर्णधार एलिसा हेली मुकली आहे, यामागील कारण जाणून घ्या.

Pranali Kodre

Women's T20 World Cup 2024: महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात अखेरचा साखळी सामना रविवारी होत आहे.

शारजाहमध्ये होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाची प्रभारी कर्णधार ताहलिया मॅकग्राने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.उपांत्य फेरीतील प्रवेशाच्यादृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने नियमित कर्णधार एलिसा हेलीला विश्रांती दिली आहे. तिच्या उजव्या पायाला दुखापत आहे. ती मैदानातही पायाला बँडेज बांधून आली होती. त्यामुळे ती या सामन्यात खेळणार नाही.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शुक्रवारी तिला एकेरी धाव घेताना दुखापत झाली होती. त्यामुळे तिला फलंदाजी करताना रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतावे लागले होते. दरम्यान, तिच्या दुखापतीवर ऑस्ट्रेलियाची मेडिकल टीम लक्ष ठेवून असून या स्पर्धेत ती पुढे खेळणार की नाही, हे तिची दुखापत कितपत गंभीर आहे, यावर ठरवले जाणार आहे.

दरम्यान, तिच्या अनुपस्थितीत मॅकग्रा ऑस्ट्रेलियाचे या सामन्यात नेतृत्व करणार आहे. तसेच एलिस पेरी उपकर्णधार असेल.

भारताच्या संघात एक बदल

भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. सजीवन सजनाच्या जागेवर पुजा वस्त्राकरचे पुनरागमन झाले आहे. हा एकच बदल भारतीय संघात झाला आहे.

प्लेइंग इलेव्हन

  • भारत - शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग

  • ऑस्ट्रेलिया - बेथ मूनी(यष्टीरक्षक), ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, अॅश्ले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ताहलिया मॅकग्रा(कर्णधार), जॉर्जिया व्हारेहम, ऍनाबेल सदरलँड, सोफी मोलिनेक्स, मेगन शट, डार्सी ब्राउन

निर्णायक सामना

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला, तर ते साखळी फेरीतील चारही सामने जिंकत थेट उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करतील. तसेच भारतासमोरील अडचणी वाढतील. तसेच जर भारताने जर हा सामना जिंकला, तर उपांत्य फेरीत जाण्याच्या भारताच्या आशा उंचावतील.

पण तरी असं झालं तर उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघांना सोमवारी होणाऱ्या न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात होणाऱ्या सामन्याच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे.

तसेच भारताने जरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला, तरी त्यांना न्यूझीलंड-पाकिस्तान सामन्याच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Latest Maharashtra News Updates : नाशिकमधील रेडीसन ब्लू हॉटेलवर निवडणूक आयोगाची कारवाई

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

भावासाठी उदयनराजे मैदानात! 'झुकेगा नही साला' म्हणत, कॉलर उडवत शिवेंद्रराजेंना मताधिक्‍याने विजयी करण्याचं केलं आवाहन

Nawab Malik : मतदानाच्या एक दिवस आधीच नवाब मलिक यांचे 'एक्स' अकाऊंट हॅक

SCROLL FOR NEXT