ICC Women's T20 World Cup 2024: महिला टी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेला गुरुवारपासून (३ ऑक्टोबर) सुरुवात होत आहे. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे होणार आहे, असं असलं तरी या स्पर्धेचे आयोजक बांगलादेश क्रिकेट बोर्डच असणार आहे.
बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे ही स्पर्धा युएईला हालवण्यात आली आहे. आता या स्पर्धेला ३ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून २० ऑक्टोबरला अंतिम सामना पार पडणार आहे.
शारजामध्ये बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड सामन्याने स्पर्धेची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत १० महिला संघ सहभागी होत आहेत. साखळी फेरीसाठी या १० संघांचे दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.
यामध्ये अ गटात भारतासह, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ आहेत. तसेच ब गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलंड हे संघ आहेत.
१० संघातील साखळी फेरीचे सामने १५ ऑक्टोबर रोजी संपतील. त्यानंतर उपांत्य फेरीतील सामने १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी होणार आहेत. त्यानंतर २० ऑक्टोबर रोजी अंतिम सामना होईल.
प्रत्येक संघ साखळी फेरीत आपल्या गटातील संघांविरुद्ध एक सामना खेळणार आहे. त्यानंतर गुणतालिकेत दोन्ही गटातून प्रत्येकी पहिल्या दोन स्थानांवर राहणारे संघ उपांत्य फेरीत पोहचील. यानंतर उपांत्य फेरीत विजय मिळवणारे संघ अंतिम सामन्यात खेळतील.
या स्पर्धेतील सामने दुबई आणि शारजाह या दोन शहरात होणार आहेत. ज्यादिवशी दोन सामने होणार आहेत, त्यादिवशी भारतीय प्रमाणवेळेनुसार पहिला सामना ३.३० वाजता चालू होणार आहे, तर दुसरा सामना ७.३० वाजता चालू होणार आहेत.
महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर भारतात स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहायला मिळणार आहेत. तसेच डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍप किंवा वेबसाईटवरही सामने पाहाता येणार आहेत.
भारताला या स्पर्धेतील पहिला सामना ४ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध भारताचा सामना ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
तिसरा सामना ९ ऑक्टोबर रोजी भारत आणि श्रीलंका संघात सामना होईल, तर १३ ऑक्टोबर रोजी भारताचा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. त्यानंतर जर भारतीय संघाला उपांत्य फेरीपर्यंत पोहचण्यात यश आले, तर भारतीय संघ बाद फेरीचे सामने खेळताना दिसेल.
हरमनप्रीत कौर ( कर्णधार), स्मृती मानधना ( उप कर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रीग्ज, रिचा घोष ( यष्टिरक्षक), यास्तिका भाटीया ( यष्टिरक्षक), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, दयालन हेमलथा, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, संजना संजीवन
राखीव खेळाडू - उमा चेत्री, तनुजा कनवर, सैमा ठाकोर
३ ऑक्टोबर, गुरुवार - बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड, शारजाह (वेळ - दु.३.३० वाजता)
३ ऑक्टोबर, गुरुवार - पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, शारजाह (वेळ - संध्या. ७.३० वाजता)
४ ऑक्टोबर, शुक्रवार - दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, दुबई (वेळ - दु.३.३० वाजता)
४ ऑक्टोबर, शुक्रवार - भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई (वेळ - संध्या. ७.३० वाजता)
५ ऑक्टोबर, शनिवार - बांगलादेश विरुद्ध इंग्लंड, शारजाह (वेळ - दु.३.३० वाजता)
५ ऑक्टोबर, शनिवार - ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, शारजाह (वेळ - संध्या. ७.३० वाजता)
६ ऑक्टोबर, रविवार - भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई (वेळ - दु.३.३० वाजता)
६ ऑक्टोबर, रविवार - वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड, दुबई (वेळ - संध्या. ७.३० वाजता)
७ ऑक्टोबर, सोमवार - इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजाह (वेळ - संध्या. ७.३० वाजता)
८ ऑक्टोबर, मंगळवार - ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, शारजाह (वेळ - संध्या. ७.३० वाजता)
९ ऑक्टोबर, बुधवार - दक्षिण आफ्रिका विरुद्ध स्कॉटलंड, दुबई (वेळ - दु.३.३० वाजता)
९ ऑक्टोबर, बुधवार - भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई (वेळ - संध्या. ७.३० वाजता)
१० ऑक्टोबर, गुरुवार - बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, शारजाह (वेळ - संध्या. ७.३० वाजता)
११ ऑक्टोबर, शुक्रवार - ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, दुबई (वेळ - संध्या. ७.३० वाजता)
१२ ऑक्टोबर, शनिवार - न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, शारजाह (वेळ - दु.३.३० वाजता)
१२ ऑक्टोबर, शनिवार - बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दुबई (वेळ - संध्या. ७.३० वाजता)
१३ ऑक्टोबर, रविवार - इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड, शारजाह (वेळ - दु.३.३० वाजता)
१३ ऑक्टोबर, रविवार - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजा (वेळ - संध्या. ७.३० वाजता)
१४ ऑक्टोबर, सोमवार- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, दुबई (वेळ - संध्या. ७.३० वाजता)
१५ ऑक्टोबर, मंगळवार - इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, दुबई (वेळ - संध्या. ७.३० वाजता)
१७ ऑक्टोबर, गुरुवार - उपांत्य फेरी १, दुबई (वेळ - संध्या. ७.३० वाजता)
१८ ऑक्टोबर, शुक्रवार - उपांत्य फेरी २, शारजाह (वेळ - संध्या. ७.३० वाजता)
२० ऑक्टोबर, रविवार - फायनल, दुबई (वेळ - संध्या. ७.३० वाजता)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.