india vs pakistan esakal
क्रिकेट

टीम इंडियाला Semi Final गाठण्यासाठी शेवटची संधी; पाकिस्तानची हवीय मदत, जाणून घ्या समीकरण

सकाळ डिजिटल टीम

Semifinals Equations: महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील निम्मे साखळी सामने पूर्ण झाले आहेत. जसजशी स्पर्धा पुढे जातेय तसतशी स्पर्धा आणखी मजेशीर होत आहे, उपांत्यफेरीसाठी समीकरणे आणखी कठीण होत चालली आहेत. काल वेस्ट इंडिजने बांगलादेशवर विजय मिळवला. वेस्ट इंडिजच्या या विजयामुळे इंग्लंड आणि साऊथ आफ्रिकेला पिछाडीवर जावे लागले आहे. तर 'ब' गटात वेस्ट इंडिज अव्वल स्थानी पोहचली आहे. 'ब' गटात वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका हे संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहेत. तर भारताच्या ('अ') गटात ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया, भारत, न्युझीलंड व पाकिस्तान हे संघ 'अ' गटात उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहेत.

'अ' गटातून कोणत्या संघाना उपांत्य फेरीमध्ये पोहचण्याची संधी आहे. याबद्दल समीकरणे जाणून घेऊयात..

भारत

भारताचा ऑस्ट्रेलियाविरूद्ध साखळी सामन्यतील शेवटचा सामना शिल्लक आहे. भारत पाकिस्तान व श्रीलंकेविरूद्धचा सामना जिंकून ४ गुंणासह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर भारताचा नेट रनरेट +०.५७६ असून भारताला उपांत्य फेरीमध्ये पोहचण्याची ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामना जिंकावा लागेल. आजच्या सामन्यात आस्ट्रेलियाने जर पाकिस्तानला पराभूत केले आणि पाकिस्तानने न्युझीलंडला पराभूत केले तर भारताचा मार्ग आणखी सुखर होईल.

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाने सुरुवातीची दोन्ही सामने जिंकून ४ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. ऑस्ट्रेलिया नेट रनरेट +२.५२४ असून उर्वरित दोन सामने जिंकून सहज उपांत्य फेरीची गाठण्याची संधी आहे.

पाकिस्तान

पाकिस्तानने श्रीलंकेविरूद्धचा सामना जिंकून २ गुण मिळवले, तर भारताविरूद्धचा सामना पाकिस्तानला गमवावा लागला. पकिस्तानला उर्वरित दोन सामन्यात ऑस्ट्रेलिया व न्युझीलंड सारख्या बलाढ्य संघाना सामोरे जायचे आहे. अशातच वडिलांच्या निधनामुळे कर्णधार फातीमा सना मायदेशी परतली आहे. त्यामुळे +०.५५५ रनरेट असलेल्या पाकिस्तानला उर्वरित दोन्ही सामने जिंकून उपांत्य फेरी गाठावी लागेल.

न्युझीलंड

न्युझीलंड भारताविरूद्धचा सामना जिंकून २ गुणांसह क्रमतालिकेत चौथ्या स्थानी आहे. +०.०५० नेट रनरेट असलेल्या न्युझीलंडला पाकिस्तान व श्रीलंकेविरूद्धचे दोन सामने जिंकून उपांत्य फेरीमध्ये पोहचता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणीचा अर्ज मिस झाला? हरकत नाही, मुदत आणखी वाढलीए! जाणून घ्या नवी तारीख

Santosh Juvekar: भूमिकेसाठी काय पण! संतोष जुवेकरचा ‘रानटी’ चित्रपटातील खतरनाक अंदाज; लूक व्हायरल

Paris Olympic 2024 पदक विजेत्या Manu Bhaker चा रॅम्प वॉक

Amit Thackeray: एकनाथ शिंदेंचा त्याग; अमित ठाकरेंसाठी शिवसेना 'हा' मतदारसंघ सोडणार

Latest Marathi News Live Updates: अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील 'जलसा' निवासस्थानाबाहेर चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या

SCROLL FOR NEXT