India vs Bangladesh 1st Test Updates Marathi : आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या फटकेबाजीनंतर भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. भारताच्या पहिल्या डावातील ३७६ धावांच्या प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या बांगलादेशचा पहिला डाव १४९ धावांवर गुंडाळला गेला. रोहित शर्मा व विराट कोहली हे दोन्ही डावांत अपयशी ठरल्याने भारतीयांची चिंता वाढली आहे. पण, सध्यातरी पहिल्या कसोटीत भारतीयांनी वर्चस्व राखले आहे.
आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर आर अश्विन ( ११३) आणि रवींद्र जडेजा ( ८६) यांनी ७व्या विकेटसाठी १९९ धावा जोडल्या. त्याआधी यशस्वी जैस्वाल ( ५६) व ऋषभ पंत ( ३९) यांनी संघाला आधार दिला होता. भारताने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या. बांगलादेशच्या हसन महमूदने पाच विकेट्स घेतल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात अप्रतिम चेंडूवर इस्लामला त्रिफळा उडवला. त्यानंतर अन्य गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करून बांगलादेशचा पहिला डाव १४९ धावांवर गुंडाळला. जसप्रीतने ४, सिराज, आकाश व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
बांगलादेशच्या तस्किन अहमदने कर्णधार रोहित ( ५) ला दुसऱ्या डावात माघारी पाठवले. यशस्वी जैस्वाल १० धावा करून नाहिद राणाच्या गोलंदाजीवर, तर विराट कोहली १७ धावांवर हसन मिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. भारताने दिसवसअखेर ३ बाद ८१ धावा केल्या आहेत आणि ३०८ धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ भारताच्या ६ बाद ३३९ धावांवरून सुरू झाला आणि दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात ३ बाद ८१ धावा केल्या.
चेपॉकवर आज दिवसभरात भारताच्या ७ व बांगलादेशच्या १० अशा एकूण १७ विकेट्स पडल्या. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर कसोटीच्या एका दिवशी या सर्वाधिक विकेट्स ठरल्या. यापूर्वी १९७९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत तिसऱ्या दिवशी १५ विकेट्स पडल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.