IND vs BAN 1st Test Day 2 esakal
क्रिकेट

IND vs BAN 1st Test: रोहितकडून Mohammad Siraj वर अन्याय, नेटिझन्स नाराज; पण, बांगलादेशला दिसले 'आकाश' Video

Swadesh Ghanekar

India vs Bangladesh 1st Test Updates Marathi: R Ashwin आणि रवींद्र जडेजा यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३७६ धावांपर्यंत मजल मारली. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात बांगलादेशला मोठा धक्का दिला. त्यानंतर Akash Deep ने सलग दोन चेंडूंत विकेट्स घेऊन बांगलादेशची अवस्था ३ बाद २६ अशी केली. दुसऱ्या दिवसाचा लंच ब्रेक झाला तेव्हा बांगलादेशने ९ षटकांत ३ बाद २६ धावा केल्या होत्या. पण, या पहिल्या सत्रात कर्णधार रोहित शर्माकडून Mohammad Siraj वर अन्याय झाल्याची भावना नेटिझन्स व्यक्त करत आहेत.

भारतीय संघाचा पहिला डाव बांगलादेशला दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात गुंडाळला. आर अश्विन ( ११३) आणि रवींद्र जडेजा ( ८६) यांच्या १९९ धावांची भागीदारीने भारताला ६ बाद १४४ धावांवरून ३४३ धावांपर्यंत पोहोचवले. त्यानंतर भारताचा उर्वरित संघ ३७६ धावांवर तंबूत परतला. हसन महमूदने पाच विकेट्स घेतल्या.

३ बाद ३४ अशा दयनीय अवस्थेतून भारताला यशस्वी जैस्वाल ( ५६) आणि ऋषभ पंत ( ३९) यांनी ९२ धावांची भागीदारी करून सावरले होते. त्यानंतर आर अश्विन व जडेजा यांनी सातव्या विकेटसाठी २४० चेंडूंत १९९ धावा जोडल्या. अश्विन ११३ धावांवर झेलबाद झाला. जसप्रीतने पहिल्याच षटकात बांगलादेशच्या शदमन इस्लामचा त्रिफळा उडवला.

त्यानंतर पुढच्याच षटकात मोहम्मद सिराजने बांगलादेशच्या नजमूल शांतोला पायचीत पकडले होते आणि जोरदार अपील झाली. मैदानावरील अम्पायरने नाबाद दिले. सिराज DRS घेण्यासाठी रोहितकडे आग्रह धरत होता. पण, रोहित व ऋषभ पंत यांनी एकमेकांशी चर्चा करून DRS न घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जेव्हा रिप्ले दाखवला गेला त्यात चेंडू यष्टींवर आदळत असल्याचे दिसत होते. त्यामुळे सिराजची आयती विकेट रोहितमुळे गेल्याची भावना नेटिझन्समध्ये आहे.

नवव्या षटकाच्या पहिल्या व दुसऱ्या चेंडूवर आकाश दीपने बांगलादेशला दोन धक्के दिले. जाकीर हसन ( २) व मोमिनूल हक ( ०) या दोघांचाही त्रिफळा त्याने उडवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video: अख्खा ट्रक खड्ड्यात गेला, पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील घटना

IND vs BAN Test, 2nd Day: गोलंदाजांमुळे पहिल्या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले, पण Rohit - Virat च्या अपयशाने टेंशन वाढवले

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

Pitru Paksha 2024 : रक्षाविसर्जन, पिंडदान, पितृशांतीसाठी यमराजांनी कावळ्यालाच का दिला बहुमान?

Vivek Oberoi : "माझं पहिलं प्रेम कॅन्सरमुळे गमावलं" ; पूर्वायुष्यावर भरभरून बोलला विवेक, म्हणाला- "मी कधीच धोका..."

SCROLL FOR NEXT