IND vs BAN 1st Test Day 2 esakal
क्रिकेट

IND vs BAN 1st Test : Jasprit Bumrah चा चेंडू सोडण्याची चूक अन् बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल; रचले गेले ५ मोठे विक्रम

India vs Bangladesh 1st Test Live : आर अश्विन ( ११३) आणि रवींद्र जडेजा ( ८६) यांच्या १९९ धावांची भागीदारीने भारताला ६ बाद १४४ धावांवरून ३४३ धावांपर्यंत पोहोचवले.

Swadesh Ghanekar

India vs Bangladesh 1st Test Updates Marathi : R Ashwin आणि रवींद्र जडेजा यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३७६ धावांपर्यंत मजल मारली. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात बांगलादेशला मोठा धक्का दिला. जसप्रीतने टाकलेला आत येणारा चेंडू शादमन इस्लामने सोडण्याची चूक केली अन् दांडी गुल झाली.

भारतीय संघाचा पहिला डाव बांगलादेशला दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात गुंडाळला. आर अश्विन ( ११३) आणि रवींद्र जडेजा ( ८६) यांच्या १९९ धावांची भागीदारीने भारताला ६ बाद १४४ धावांवरून ३४३ धावांपर्यंत पोहोचवले. त्यानंतर भारताचा उर्वरित संघ ३७६ धावांवर तंबूत परतला. हसन महमूदने पाच विकेट्स घेतल्या. ३ बाद ३४ अशा दयनीय अवस्थेतून भारताला यशस्वी जैस्वाल ( ५६) आणि ऋषभ पंत ( ३९) यांनी ९२ धावांची भागीदारी करून सावरले होते. त्यानंतर आर अश्विन व जडेजा जोडी चमकली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी २४० चेंडूंत १९९ धावा जोडून अनेक विक्रम मोडले. अश्विन १३३ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ११३ धावांवर झेलबाद झाला.

बांगलादेशच्या जलदगती गोलंदाजांनी कसोटी डावात घेतलेल्या सर्वाधिक विकेट्स

  • १० वि. पाकिस्तान, रावळपिंडी, २०२४

  • ९ वि. झिम्बाब्वे, बुलावायो, २००१

  • ९ वि. न्यूझीलंड, हॅमिल्टन, २००१

  • ९ वि. श्रीलंका, कोलंबो, २००५

  • ९ वि. न्यूझीलंड, माउंट, २०२२

  • ९ वि. भारत, चेन्नईस २०२४

६व्या क्रमांकाच्या खाली भारताकडून कसोटीत झालेल्या सर्वाधिक धावा

  • २७७ - ७०/६ ते सर्वबाद ३४७ वि. वेस्ट इंडिज, १९७१

  • २३२ - १४४/६ ते सर्वबाद ३७६ वि. बांगलादेश, २०२४

  • २१९ - १४६/६ ते सर्वबाद ३६५ वि. इंग्लंड, २०२१

  • २१० - ११९/६ ते सर्बाद ३२९ वि. दक्षिण आफ्रिका, १९९६

  • २०१ - ९९/६ ते सर्वबाद ३०० वि. इंग्लंड, १९६४

भारताविरुद्ध कसोटीत पाच विकेट्स घेणारे बांगलादेशी गोलंदाज

  • ६/१३२ - नईमूर रहमान, ढाका, २०००

  • ५/६२ - शाकिब अल हसन, चट्टोग्राम, २०१०

  • ५/६३ - मेहिदी हसन मिराज, मिरपूर, २०२२

  • ५/७१ - शाहदात होसैन, चट्टोग्राम, २०१०

  • ५/८३ - हसन महमूद, चेन्नई, २०२४

अबू जायेद याने २०१९ मध्ये इंदोर कसोटीत भारताविरुद्ध १०८ धावांत ४ विकेट्स घेतल्या होत्या आणि ती भारतातील बांगलादेशच्या गोलंदाजाची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती.

कसोटीत सर्वाधिक पाच विकेट्स घेणारे बांगलादेशी गोलंदाज

४ - शाहदात होसैन ( ३८ सामने)

२ - रोबिबूल इस्लाम ( ९ सामने )

२ - हसन महमूद ( ४ सामने)

हसन महमूद हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध भारतात कोणत्याही फॉरमॅटमध्ये डावात पाच विकेट्स घेणारा पहिला बांगलादेशी गोलंदाज ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT