IND vs BAN 1st Test  esakal
क्रिकेट

IND vs BAN 1st Test : Virat Kohli वर रोहित वैतागला; 'तो' एक निर्णय ज्याने अम्पायरही चकित झाले

Swadesh Ghanekar

India vs Bangladesh 1st Test Updates Marathi : भारतीय संघाने पहिल्या कसोटीवर वर्चस्व गाजवले आहे. बांगलादेशचा पहिला डाव १४९ धावांवर गुंडाळून भारताने मजबूत आघाडीच्या दिशेने कूच केली आहे. पण, दुसऱ्या डावातही रोहित शर्मा व विराट कोहली अपयशी ठरल्याने चिंता वाढली आहे. विराटच्या विकेटवरून रोहित संतापलेला दिसला. कारण काय तर....

आर अश्विन ( ११३) आणि रवींद्र जडेजा ( ८६) यांनी भारताला मजबूत धावसंख्या उभारून दिली. ६ बाद १४४ धावांवरून त्यांनी संघाला ३४३ धावांपर्यंत पोहोचवले. त्यानंतर उर्वरित संघ ३७६ धावांवर तंबूत परतला. हसन महमूदने पाच विकेट्स घेतल्या. अश्विन व जडेजा यांनी सातव्या विकेटसाठी २४० चेंडूंत १९९ धावा जोडल्या. अश्विन ११३ धावांवर झेलबाद झाला.

जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात बांगलादेशच्या शदमन इस्लामचा त्रिफळा उडवला. त्यानंतर पुढच्याच षटकात मोहम्मद सिराजने बांगलादेशच्या नजमूल शांतोला पायचीत पकडले होते, परंतु DRS न घेतल्याने तो वाचला. नवव्या षटकाच्या पहिल्या व दुसऱ्या चेंडूवर आकाश दीपने बांगलादेशला दोन धक्के दिले. बांगलादेशचा निम्मा संघ ४० धावांवर माघारी परतला होता. त्यानंतर त्यांचा पहिला डाव १४९ धावांवर गुंडाळला गेला. जसप्रीतने ४, सिराज, आकाश व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

दुसऱ्या डावात रोहित ( ५) अपयशी ठरला. तस्किन अहमदने त्याला स्लिपमध्ये झेल देण्यास भाग पाडले. यशस्व जैस्वालला ( १०) नाहिद राणाने झेलबाद केले. विराट कोहली आज तरी खेळेल असे वाटले होते, परंतु हसन मिराजने त्याला ( १७) पायचीत पकडले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ३ बाद ८१ धावाव करून आघाडी ३०८ पर्यंत वाढवली होती.

रोहित शर्मा भडकला....

मिराझच्या गोलंदाजीवर विराट पायचीत झाला, परंतु त्याने DRS घेतला असता तर तो वाचला असता. रिप्लेमध्ये चेंडू पॅडवर आदळण्यापूर्वी बॅटला घासून गेल्याने अल्ट्रा एजमध्ये स्पष्टपणे दिसले. पण, विराटने DRS घेतला नाही. रिप्ले पाहिल्यानंतर रोहित शर्मा संतापला आणि अम्पायर रिचर्ड केटलबोरॉग यांनीही आश्चर्य व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

IND vs BAN 1st Test : Shakib Al Hasanचं 'काळा' धागा चघळण्यामागचं मॅजिक; दिनेश कार्तिकनं उलगडलं लॉजिक

Priyanka Gandhi: जेपी नड्डांच्या पत्राला प्रियंका गांधींचं उत्तर; म्हणाल्या, चुकीच्या भाषेचा वापर...

SCROLL FOR NEXT