Jasprit Bumrah  esakal
क्रिकेट

IND vs BAN 1st Test : Jasprit Bumrah ला आणखी एक विकेट, यशस्वी जैस्वालचा भन्नाट झेल Video

Swadesh Ghanekar

India vs Bangladesh 1st Test Updates Marathi : भारतीय संघाला विजयासाठी आता केवळ ८ विकेट्स हव्या आहेत. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावातही जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) पहिली विकेट घेऊन बांगलादेशला धक्का दिला. यशस्वी जैस्वालने झेप घेऊन अविश्वसनीय झेल घेत, जसप्रीतच्या मेहनतीला यश मिळवून दिलं. त्यानंतर आर अश्विनने दुसरा धक्का दिला.

भारताच्या पहिल्या डावातील ३७६ धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव १४९ धावांवर गुंडाळला गेला. भारताने दुसऱ्या डावात ऋषभ पंत ( १०९) व शुभमन गिल ( नाबाद ११९) या शतकवीरांच्या जोरावर मोठी धावसंख्या उभी केली. या जोडीने २१७ चेंडूंत १६७ धावांची भागीदारी केली. ऋषभने १२८ चेंडूंत १३ चौकार व ४ षटकारांसह तो १०९ धावा केल्या. शुभमनने १७६ चेंडूंत १० चौकार व ४ षटकारांसह ११९ धावांची नाबाद खेळी केली.

भारताने ४ बाद २८७ धावांवर डाव घोषित करून बांगलादेशसमोर ५१५ धावांचे लक्ष्य ठेवले. दुसऱ्या डावात बांगलादेशकडून सकारात्मक सुरुवात पाहायला मिळाली. जाकिर हसन आणि शादमन इस्लाम यांनी पहिल्या विकेटसाठी ६२ धावा जोडल्या. १७व्या षटकात जसप्रीत बुमराहने पहिले यश मिळवून दिले. ४७ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३३ धावा करणाऱ्या हसनला बाद केले. यशस्वीने हवेत झेल घेत अफलातून कॅच टिपला. त्यानंतर आर अश्विनने दुसरा सलामीवीर इस्लामला ( ३५) गिलकरवी झेलबाद केले. बांगलादेशने २५ षटकांत २ बाद ९६ धावा केल्या आहेत.

जानेवारी २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेत बुमराहने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात केली. बुमराहने १९६ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४०१ विकेट्सचा आकडा गाठला आहे. ज्यामध्ये कसोटी(१६३), वन-डे(१४९), ट्वेंटी-२०(८९) विकेट्सचा समावेश आहे. भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादित १०वे स्थान मिळवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharavi: 5 हजार जणांचा जमाव; भडकाऊ पोस्ट व्हायरल अन् गर्दीत बाहेरचे लोक, धारावी मशीद प्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा

Satyapal Malik: "अंबानींची फाईल माझ्याकडं सहीसाठी आली होती, पण..."; सत्यपाल मलिकांचा खळबळजनक खुलासा

...नाहीतर हातपाय तोडू, पाकिस्तानी चित्रपट 'द लिजेंड ऑफ मौला जट' विरोधात MNS आक्रमक, थेट धमकीच दिली

Dharavi Mosque: धारावी मशीद प्रकरण; बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी समितीला 8 दिवसांची मुदत, अन्यथा...

Zero to hero! शुभमन गिलने भारी पराक्रम नोंदवला, आपला Rishabh Pant ही विक्रमाच्या बाबतीत मागे नाही राहिला

SCROLL FOR NEXT