IND vs BAN 1st Test day 3 esakal
क्रिकेट

IND vs BAN 1st Test : 'भाई, इधर एक फिल्डर आएगा...'; Rishabh Pant ने बांगलादेशची फिल्डिंग सेट केली Video Viral

India vs Bangladesh 1st Test Live Rishabh Pant setting Fielding : भारतीय संघाने पहिल्या कसोटीत चारशेपार आघाडी घेतली आहे. शुभमन गिल व ऋषभ पंत यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावताना चौथ्या विकेटसाठी शतकीपार भागीदारी पूर्ण केली.

Swadesh Ghanekar

India vs Bangladesh 1st Test Updates Marathi : भारतीय संघ पहिल्या कसोटीत फ्रंट सीटवर बसला आहे. बांगलादेशचा पहिला डाव १४९ धावांवर गुंडाळल्यानंतर यजमानांनी दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी केली आहे. शुभमन गिल आणि ऋषभ पंत ( Rishabh Pant) यांच्या फटकेबाजीने भारताची आघाडी ४०० पार पोहोचवली आहे. दरम्यान, ऋषभचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि त्यात तो चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करतोय.

भारताच्या पहिल्या डावातील ३७६ धावांच्या प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या बांगलादेशचा पहिला डाव १४९ धावांवर गुंडाळला गेला. पहिल्या डावात आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर आर अश्विन ( ११३) आणि रवींद्र जडेजा ( ८६) यांनी ७व्या विकेटसाठी १९९ धावा जोडल्या. त्याआधी यशस्वी जैस्वाल ( ५६) व ऋषभ पंत ( ३९) यांनी संघाला आधार दिला होता. भारताने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या. बांगलादेशचा पहिला डाव १४९ धावांवर गुंडाळला. जसप्रीतने ४, सिराज, आकाश व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

दुसऱ्या डावातही रोहित शर्मा ( ५), विराट कोहली (१७) काही खास करू शकले नाही. यशस्वी १० धावा करून माघारी परतल्याने भारताला ६७ धावांत ३ धक्के बसले होते. पण, शुभमन गिल व ऋषभ पंत यांनी डाव सावरला. तिसऱ्या दिवशी गिलने दोन खणखणीत षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. कसोटीच्या दुसऱ्या डावातील ही त्याची सलग चौथी 50+ धावांची खेळी ठरली. ऋषभनेही त्याचा ट्रेड मार्क वन हँड सिक्स खेचून अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी २७.४ षटकांत शतकी भागीदारी पूर्ण केली.

ऋषभने ८८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि ही त्याची कसोटीतील तिसरी संथ फिफ्टी ठरली. २०२१ लंडन येथे इंग्लंडविरुद्ध त्याने १०४ चेंडूंचा आणि त्याचवर्षी ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०० चेंडूंचा सामना करून अर्धशतक झळकावले होते. ऋषभ व शुभमन यांनी भारताला ५० षटकांत ३ बाद १९९ धावांपर्यंत पोहोचवून आघाडी ४२२ धावांपर्यंत पोहोचवली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT