IND vs BAN 2nd T20I esakal
क्रिकेट

IND vs BAN 2nd T20I: हम 'सात'!भारतीय संघाने ट्वेंटी-२०त नोंदवला भारी रेकॉर्ड; पाकिस्तानच्या नाकावर मारली टिचकी

Swadesh Ghanekar

India vs Bangladesh 2nd T20I Records : भारतीय संघाने नवी दिल्ली येथे झालेल्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात बांगलादेशवर ८६ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताच्या ९ बाद २२१ धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशला ९ बाद १३५ धावा करता आल्या. नितीश कुमार रेड्डी ( ७४), रिंकू सिंग ( ५३) आणि हार्दिक पांड्या ( ३२) यांनी दमदार खेळ केला. त्यानंतर गोलंदाजीत नितीश व वरुण चक्रवर्थीने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा, मयांक यादव आणि रियान पराग यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. भारतीय गोलंदाजांनी हम 'सात' वाला विक्रम या सामन्यात नोंदवला.

  • नितीशने काल ३४ चेंडूंत ४ चौकार व ७ षटकारांची आतषबाजी करून ७४ धावांची खेळी केली. शिवाय त्याने नंतर दोन विकेट्सही घेतल्या. भारतासाठी ट्वेंटी-२०च्या एकाच सामन्यात पन्नास धावा आणि दोन विकेट्स घेणारा तो युवराज सिंग ( २००९), हार्दिक पांड्या ( २०२२), अक्षर पटेल ( २०२३), वॉशिंग्टन सुंदर ( २०२३) यांच्यानंतर पाचवा खेळाडू ठरला.

  • नितीश आणि रिंकू सिंग यांनी काल एकाच षटकात २६ धावा चोपल्या. भारताकडून एकाच षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या विक्रमात कालच्या खेळीचा सातवा क्रमांक लागतो. युवीने २००७ मध्ये व रोहित व रिंकू ने २०२४ मध्ये एकाच षटकात ३६ धावा कुटल्या होत्या. ऋतुराज व तिलक वर्मा यांनी २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३० धावा केल्या होत्या.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त अर्धशतक झळकावणारा नितीश रेड्डी हा चौथा युवा भारतीय फलंदाज ठरला आहे. रोहित शर्माने २० वर्ष व १४३ दिवसांचा असताना २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा पराक्रम केला होता. त्यानंतर तिलक वर्माने २०२३ मध्ये २० वर्ष व २७१ दिवसांचा असताना वेस्ट इंडिजविरुद्ध आणि २० वर्ष व ३३२ दिवसांचा असताना बांगलादेशविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. ऋषभ पंतने २१ वर्ष व ३८ दिवसांचा असताना २०१८मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध हा पराक्रम केला होता, नितीशने २१ वर्ष व १३६ दिवसांचा असताना ट्वेंटी-२०त अर्धशतक झळकावले.

  • २०२४ च्या कॅलेंडर वर्षातील भारताचा हा २० वा विजय आहे ( सुपर ओव्हरसह ) आणि त्यांनी पाकिस्तानशी ( २०२०) बरोबरी केली आहे. या विक्रमात युगांडा ( २०२३) २९ विजयांसह आघाडीवर आहे. भारताने २०२२ मध्ये २८ आणि तन्झानियाने २०२२ मध्ये २१ विजय मिळवले होते.

  • भारताच्या सात गोलंदाजांनी काल गोलंदाजी केली आणि सर्वांनी विकेट घेतल्या. आंतराष्ट्रीय ट्वेंटी-२०त इतके गोलंदाज वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि भारताच्या सात गोलंदाजांनी एकाच सामन्यात विकेट घेण्याचीही ही पहिली वेळ आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभा निवडणुकीत कोकणातील 15 जागा महायुती जिंकणार; 'मविआ'वर निशाणा साधत उदय सामंतांनी व्यक्त केला विश्वास

Latest Maharashtra News Updates : आजचा दिवस दुःखाचा आहे - किरण राव

Rafael Nadal announces retirement : 'लाल'मातीचा बादशाह राफेल नदालची निवृत्तीची घोषणा, २२ ग्रँड स्लॅम जेतेपदं नावावर

Nana Patole : राहुल गांधींच्या केसालाही धक्का लागला तर याद राखा : नाना पटोले

Wagholi Accident : वाघोलीत डंपरच्या धडकेत पादचारी तरुणी गंभीर जखमी,आमदार अशोक पवार यांनी स्वतः उचलून पाठविले उपचारासाठी

SCROLL FOR NEXT