IND vs BAN 2nd TEst esakal
क्रिकेट

IND vs BAN 2nd Test : मोठे अपडेट्स : भारतीय संघ Kanpur स्टेडियमवरून हॉटेलमध्ये परतला; आजचा खेळ होण्यावर शंका

Swadesh Ghanekar

India vs Bangladesh 2nd Test : भारत-बांगलादेश यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीचा दुसऱ्या दिवसाचा खेळ होण्याची शक्यता कमीच वाटत आहे. दोन्ही संघाचे खेळाडू स्टेडियमवरून आपापल्या हॉटेलमध्ये परतले आहेत. त्यामुळे कसोटीचा दुसरा दिवस होणार नसल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. कालचा पहिला दिवस ३५ षटकानंतर थांबवण्यात आला होता. प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशने ३ बाबद १०७ धावा केल्या आहेत. आज दुसऱ्या दिवसाच्ाय खेळासाठी दोन्ही संघांचे खेळाडू Kanpur येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर आले होते, परंतु दहा वाजून गेले तरी दिवसाचा खेळ सुरू झाला नाही. काही मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार दोन्ही संघाचे खेळाडू हॉटेलमध्ये परतले आहेत.

कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवसातील खेळ पावसामुळे दोन सत्रातच संपवला गेला. कानपूर कसोटीत पावसाचा व्यत्यय येईल असा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तवला होता. त्यानुसार पावसामुळेच सामना एक तास उशीराने सुरू झाला. त्यानंतर दोन सत्र खेळवली गेली. पण, लंच ब्रेकनंतर काही षटकांत पुन्हा पावसाने हजेरी लावली आणि दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला गेला. बांगलादेशने ३५ षटकांत ३ बाद १०७ धावा केल्या आहेत. पावसामुळे दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला गेला.

दुसऱ्या दिवशीही जोरदार पावसामुळे संपूर्ण मैदान ताडपत्रीने झाकले गेले आहे. त्यामुळे सामना सुरू होण्यास विलंब होईल असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. ग्रान पार्कवरील मैदानावर पाणी निचरा होण्याची प्रणाली तितकी चांगली नसल्याने मैदान सुकण्यास खूप वेळ लागू शकतो. ही परिस्थिती लक्षात घेता दोन्ही संघाच्या खेळाडूंनी हॉटेलमध्ये जाऊन विश्रांती घेण्याचे ठरवले असावे. त्यामुळे ते स्टेडियममधून हॉटेलच्या दिशेने रवाना झाले. तुर्तास तरी पाऊस थांबलेला नाही.

काल काय झालं?

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आकाश दीपने बांगलादेशचे दोन्ही सलामीवीर जाकिर हसन ( ०) आणि शादमन इस्लाम ( २४) यांना बाद केले. मोमिनूल हक व कर्णधार नजमूल होसैन शांतो यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. लंच ब्रेकनंतर अश्विनने बांगलादेशची सेट जोडी तोडली. शांतोला त्याने ३१ धावांवर पायचीत केले. दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय झाला तेव्हा बांगलादेशने ३५ षटकांत ३ बाद १०७ धावा केल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: खुशखबर! 'लाडकी बहीण'चा तिसरा हप्ता जमा होण्यास झाली सुरूवात; पैसे आले की नाही 'असे' करा चेक

Tata Factory Fire: टाटा समूहाच्या आयफोन प्लांटला भीषण आग; 100हून अधिक पोलिस तैनात, पाहा- VIDEO

IND vs BAN, 2nd Test: दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द! पावसाने खेळाडूंना मैदानात उतरूच दिलं नाही

Dharmveer Movie: ‘धर्मवीर ३’चे स्क्रीप्ट मी लिहिणार ! फडणवीस यांनी का केला मोठा दावा?

Latest Maharashtra News Live Updates : हिजबुल्लाह नेता हसन नसराल्लाह ठार? IDF ची सोशल मीडियावर पोस्ट

SCROLL FOR NEXT