IND vs BAN 2nd Test  esakal
क्रिकेट

IND vs BAN 2nd Test : गर्रर्रssss! Ravindra Jadeja नं बांगलादेशच्या कर्णधाराला गंडवले, स्टम्प उडाला हेही नाही कळले Video

India vs Bangladesh 2nd Test : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीतही विजयाच्या दिशेने कूच केली आहे. आर अश्विनच्या तीन धक्क्यांनंतर रवींद्र जडेजाने कमाल केली आहे.

Swadesh Ghanekar

India vs Bangladesh 2nd Test : भारतीय संघाने कानपूर कसोटीवर वर्चस्व गाजवले आहे. ५२ धावांची आघाडी घेऊन त्यांनी बांगलादेशला पुन्हा फलंदाजीला बोलावले. आर अश्विन व रवींद्र जडेजा यांच्या फिरकीसमोर बांगलादेशने पुन्हा गुडघे टेकले आहेत.

भारताने चौथ्या दिवशी कमाल केली. बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांवर गुंडाळल्यानंतर भारतीय फलंदाजांनी ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी केली. ३ षटकांत ५० धावा, १०.१ षटकांत फलकावर शतक, १८.२ षटकांत १५० धावा, २४.२ षटकांत २०० धावा अन् ३०.१ षटकांत २५० धावांचा टप्पा ओलांडून भारतीय संघाने विक्रम नोंदवले. कसोटी क्रिकेटमध्ये हे पाचही टप्पे वेगाने पार करणारा तो जगातील एकमेव संघ ठरला.

रोहित शर्माची चतुर चाल...

भारताने ९ बाद २८५ धावांवर डाव घोषित करून ५२ धावांच्या आघाडीसह बांगलादेशला पुन्हा फलंदाजीला बोलावले. रोहित शर्माने ही चतुर चाल खेळून भारताला अशक्यप्राय विजयासाठी प्रेरित केले. आर अश्विनने चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात दोन धक्के दिल्याने बांगलादेशची अवस्था २ बाद २६ अशी केली. पाचव्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात अश्विनने आणखी एक धक्का दिला. पहिल्या डावातील शतकवीर मोमिनूल हकला ( २) त्याने स्लीपमध्ये लोकेश राहुलकरवी झेलबाद केले.

आर अश्विनचा दबदबा अन्...

आशियाई खंडात आर अश्विनने १०० विकेट्स पूर्ण केल्या आणि असा पराक्रम करणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. या लिस्टमध्ये मुथय्या मुरलीधरन ( १६७), अनिल कुंबळे ( १०२) हे त्याच्या पुढे आहेत. कसोटीच्या तिसऱ्या डावात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांमध्येही अश्विनने पाचवे स्थान पटकावले आहे. त्याने १६९ विकेट्ससह जेम्स अँडरसनला ( १६६) मागे टाकले.

रवींद्र जडेजाने त्यानंतर सलग दोन षटकांत नजमूल शांतो ( १९) व लिटन दास ( १) या प्रमुख खेळाडूंना बाद केले. आकाश दीपने मोठा धक्का देताना अर्धशतकवीर शादमन इस्लामला ( ५०) बाद केले. बांगलादेशचे ६ फलंदाज ९४ धावांत माघारी परतले. जडेजाने तिसरी विकेट घेताना शाकिब अल हसनला ( ०) बाद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

AUS vs IND 1st Test: बुमराहने जिंकला टॉस! नितीश रेड्डी अन् हर्षित राणाचे भारताकडून पदार्पण; पाहा 'प्लेइंग-11'

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

दहावी-बारावी बोर्डाचे ठरलं वेळापत्रक! यंदा परीक्षेचे सीसीटीव्हीत होणार रेकॉर्डिंग; निकालापर्यंत फुटेज साठविण्याचे केंद्रांना बंधन; केंद्रांवरील सुविधांची १५ डिसेंबरपर्यंत पडताळणी

Panchang 22 November: आजच्या दिवशी शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

SCROLL FOR NEXT