IND vs BAN 2nd Test  esakal
क्रिकेट

IND vs BAN 2nd Test : कानपूर कसोटी विलंबाने सुरू होणार; BCCI ने सांगितली वेळ, तरीही घोळ होणार

Swadesh Ghanekar

India vs Bangladesh 2nd Test Marathi Updates : भारताने पहिल्या कसोटीत विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. बांगलादेशविरुद्धची दुसरी कसोटी आजपासून कानपूर येथे सुरू होणार आहे, परंतु सामन्याचा पहिला दिवस सुरू होण्यास विलंब झाला आहे. काल कानपूर येथे रात्रभर पाऊस पडला आणि अजूनही मैदान सुकलेलं नाही. त्यामुळे आता कुठे कव्हर्स हटवण्यात आले आहेत, परंतु खेळपट्टीची ९.३० वाजता पाहणी केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.

कानपूरची खेळपट्टी पाहता भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल अपेक्षित आहेत. कुलदीप यादव किंवा अक्षर पटेल यांच्यापैकी एका संघात स्थान मिळू शकते. मोहम्मद सिराज किंवा जसप्रीत बुमराहला आगामी मालिकांसाठी आज विश्रांती दिली जाऊ शकते. बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याने कालच कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. पण, त्याला घरच्या मैदानावर मीरपूर कसोटीत खेळण्याची संधी मिळणे अवघड आहे आणि त्यामुळे भारताविरुद्धची कसोटी ही त्याची शेवटची ठरू शकते.

दरम्यान, अजूनही मैदान सुकवण्याचे काम सुरू आहे. सीमारेषेजवळील मैदान ओलं असल्याने ग्राऊंड्सस्टाफची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे सामना सुरू होण्यास आणखी विलंब लागू शकतो. सामनाधीकारींनी ९.३० वाजता खेळपट्टीची पाहणी केली. BCCI ने दिलेल्या अपडेट्सनुसार १० वाजता नाणेफेक होईल आणि १०.३० वाजता मॅच सुरू होईल.

बांगलादेश कसोटी संघ : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास, मेहिदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्किन अहमद, सय्यद खालेद अहमद, जाकेर अली अनिक

भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव , मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्नाटकात उर्दू भाषा अनिवार्य! वादग्रस्त निर्णयामुळे राजकीय वातावरण तापले

Kamindu Mendis ची लै भारी कामगिरी! रोहित, विराट यांनाही 'हे' नाही जमलं, पठ्ठ्याची थेट ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी

Shardiya Navratri 2024: नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावताय? मग जाणून घ्या नियम, आयुष्यात मिळेल यश

George Munsey : T10 सामन्यात फलंदाजाचे वादळी शतक; १० चौकार अन् ६ षटकारांची आतषबाजी, मोडला भारतीयाचा विक्रम Video

Latest Maharashtra News Updates: हायकोर्टात पोहचले चायनीज लसणाचे प्रकरण

SCROLL FOR NEXT