Sarfaraz Khan in Irani Cup Up Updates: भारतीय संघाने चेन्नई कसोटीत दणदणीत विजय मिळवला आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आता दुसरी कसोटी २७ सप्टेंबरपासून कानपूर येथे सुरू होणार आहे. खेळपट्टीचा अंदाज पाहता भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदलही अपेक्षित आहे. हेच बदल लक्षात घेऊन भारताचा स्टार फलंदाज मुंबईत परतणार आहे आणि BCCI कडून त्याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
कानपूर येथे होणाऱ्या IND vs BAN दुसऱ्या कसोटीसाठी सर्फराज खान भारतीय क्रिकेट संघासोबत नसण्याची शक्यता आहे. BCCI चे निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी सर्फराजने इराणी चषक स्पर्धेत खेळावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. टीम इंडियातील फलंदाजांना दुखापतीची चिंता नसल्यास, सर्फराजला देशांतर्गत स्पर्धेत भाग घेण्यासाठी रिलीज केले जाण्याची शक्यता आहे.
सर्फराज नुकत्याच पार पडलेल्या दुलीप ट्रॉफीत खेळला होता आणि तो तेथून थेट चेन्नईत टीम इंडियाच्या ताफ्यात दाखल झाला होता. सर्फराजने या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध कसोटी संघात पदार्पण केले. पण, बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळाली नाही. दुसऱ्या कसोटीतही त्याला संधी मिळणे अवघड आहे. लोकेश राहुलचे प्लेइंग इलेव्हनमधील स्थान पक्के आहे.
त्यामुळे इराणी चषक स्पर्धेसाठी त्याला रिलीज केले जाऊ शकते. “भारताचे निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी सर्फराजला इराणी चषकात खेळण्याची परवानगी देण्यासाठी मुख्य संघातून सोडण्यात यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. नेटमधील सराव सत्रात कोणत्याही फलंदाजाला दुखापत किंवा प्रमुख फलंदाजांना फिटनेसची समस्या जाणवलेली नाही. त्यामुळे सर्फराजला रिलीज केले जावे असे त्यांना वाटते. कानपूरहून लखनौला पोहोचण्यासाठी फक्त एक तास लागतो, त्यामुळे कानपूर कसोटी सुरू झाल्यानंतरही सर्फराज लखनौला रवाना होऊ शकतो,''असे एका सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.
सर्फराज खानला बाकावर बसवून ठेवण्याची गरज नाही. १ ऑक्टोबरपासून मुंबई विरुद्ध उर्वरित भारत असा इराणी चषकाचा सामना सुरू होईल. कानपूरमध्ये IND vs BAN दुसरी कसोटी २७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.