IND vs BAN 2nd Test esakal
क्रिकेट

IND vs BAN 2nd Test : भारताचा वर्ल्ड रेकॉर्ड! ८५ वर्षांत असा सामना झाला नाही; Yashasvi Jaiswal ने मोडला १९७१ सालचा विक्रम

India vs Bangladesh 2nd Test : भारतीय संघाने कानपूर कसोटी जिंकली. सामन्याचे अडीच दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतरही टीम इंडियाने योग्य रणनीती आखून बांगलादेशला नमवले...

Swadesh Ghanekar

India vs Bangladesh 2nd Test : कानपूर कसोटीचे अडीच दिवस पावसामुळे वाया गेले होते. त्यामुळे भारत-बांगलादेश कसोटीचा निकाल ड्रॉ लागेल असाच सर्वांचा अंदाज होता. पण, कर्णधार रोहित शर्माने डाव खेळला अन् खेळाडूंनी त्याचा विश्वास सार्थ ठरवताना विजय मिळवला. भारताने या विजयासह मालिका २-० अशी खिशात घातली. बांगलादेशच्या २३३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ९ बाद २८५ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव १४६ धावांवर गुंडाळला गेला. टीम इंडियाने १७.२ षटकांत ३ बाद ९८ धावा करून विजयाची नोंद केली आणि १० विक्रमांची नोंद झाली.

घरच्या मैदानावर राज्य...

  • भारतीय संघाने २०१३ पासून ते २०२४ पर्यंत घरच्या मैदानावर सलग १८ कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी १९९४ ते २००० व २००४ ते २००८ या कालावधीत सलग १० कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता.

  • कसोटीत सर्वाधिक विजयाच्या विक्रमात ऑस्ट्रेलिया ( ४१४) अव्वल स्थानावर आहे. इंग्लंड ( ३९७), वेस्ट इंडिज ( १८३) अनुक्रम दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारताने आज १८० वा कसोटी सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेला ( १७९) मागे टाकले.

  • दोन्ही डावांत मिळून कमी चेंडूंत जिंकलेला हा चौथा सामना आहे. यापूर्वी १९३५ मध्ये इंग्लंडने ब्रिजटाऊन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध २७६ चेंडूंत विजय मिळवला होता. २०२४ मध्ये भारताने २८१ चेंडूंत दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला होता. भारताने आजची कसोटी ३१२ चेंडूंत जिंकली. भारताने यासह १९३२ सालचा ( 327 चेंडू AUS vs SA, Melbourne) विक्रम मोडला.

  • कसोटी क्रिकेटमध्ये ७ पेक्षा जास्त रन रेट ठेवून विजय मिळवणारा भारत हा पहिला संघ ठरला. बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत भारताची दोन्ही डावातील सरासरी ही ७.३६ अशी राहिली आहे. यापूर्वी २००५ मध्ये दक्षिण आफ्रिकेने केप टाऊन कसोटीत ६.८० च्या सरासरीने झिम्बाब्वेला नमवले होते.

यापूर्वी भारताची सर्वोत्तम सरासरी ही ५.३ ( वि. पाकिस्तान, लाहोर २००६) इतकी होती.

दोन दिवसाचा खेळ नाही तरी...

भारत-बांगलादेश कसोटीतील अडीच दिवस पावसामुळे वाया गेली, तरीही हा सामना टीम इंडियाने जिंकला. पण, कसोटीचे दोन दिवस खेळ न होऊनही मॅच जिंकण्याची ही सातवी वेळ आहे.

  • इंग्लंड वि. न्यूझीलंड, ड्युनेडीन, १९५५

  • इंग्लंड वि. न्यूझीलंड, हेडिंग्ली, १९५८

  • इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका, २०००

  • न्यूझीलंड वि. बांगलादेश, हॅमिल्टन, २००१

  • न्यूझीलंड वि. बांगलादेश, वेलिंग्टन, २०१९

  • न्यूझीलंड वि. भारत, साऊहॅम्प्टन, २०२१

  • इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका, दी ओव्हल, २०२२

  • भारत वि. बांगलादेश, कानपूर, २०२४

भारतातील कसोटीतील सर्वोत्तम रन रेट

  • ४.३९ - भारत वि. बांगलादेश, कानपूर २०२४

  • ४.१३ - भारत वि. श्रीलंका, चेन्नई, १९८२

  • ४.१२ - भारत वि. वेस्ट इंडिज, राजकोट, २०१८

  • ४.१० - भारत वि. वेस्ट इंडिज, वानखेडे, २०१३

  • ४.०१ - भारत वि. बांगलादेश, कोलकाता, २०१९

IND vs BAN 2nd Test
  • भारतात कसोटीत दोन्ही डावांत १००च्या स्ट्राईक रेटने ५०+ धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये यशस्वी जैस्वालने ( ५१ चेंडू ७२ धावा आणि ४५ चेंडू ५१ धावा) स्थान पटकावले. यापूर्वी २०११ मध्ये वीरेंद्र सेहवागने वेस्ट इंडिजविरुद्ध दिल्ली कसोटीत ५५ ( ४६) व ५५ ( ५५) धावा केल्या होत्या.

  • कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये ( २३ वर्षांखालील) यशस्वी जैस्वालने १९७१ सालचा सुनील गावस्कर यांचा विक्रम मोडला. जैस्वालने २०२४ मध्ये आतापर्यंत ९२९ दावा केल्या आहेत. गावस्करांनी १९७१ मध्ये ९१८ धावा केल्या होत्या.

  • भारत-बांगलादेश कसोटीत एकही निर्धाव षटक पडले नाही आणि १९३९ ( इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका) नंतर कसोटीत असे प्रथमच घडले.

  • भारताकडून कसोटीत सर्वाधिक ११ वेळा आर अश्विनने मॅन ऑफ दी सीरिजचा पुरस्कार जिंकला आहे. त्यानंतर वीरेंद्र सेहवाग व सचिन तेंडुलकर ( प्रत्येकी ५ ) हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Satara Crime: कश्‍मिरासह चौघांकडून १४ कोटींची फसवणूक; आणखी एक गुन्हा दाखल

Cyber Fraud Alert : ऑनलाइन फोटो पोस्ट करताय? सावध व्हा! तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात; काय आहे नवा फ्रॉड? सुरक्षेचा उपाय पाहा

Price Hike : लसण, कांदा, खाद्यतेल भडकले...लसण प्रति किलो ४००, खाद्यतेल डब्ब्यामागे २०० रुपयांनी महागले

Maharashtra Politics: ..तर राज्यात लागू होवू शकते राष्ट्रपती राजवट; सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT