India vs England 3rd Test Day 4 Live Scorecard Updates News Marathi 
क्रिकेट

Ind vs Eng 3rd Test Day 4 : भारताने इंग्लंडचा 434 धावांनी केला पराभव, मालिकेत 2 - 1 ने घेतली आघाडी

India vs England 3rd Test Day 4 Live Scorecard Updates News : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा आजचा चौथा दिवस आहे.

Kiran Mahanavar

IND vs ENG  3rd Test : भारताचा दणदणीत विजय 

India Vs England 3rd Test Day 4 Live Score : भारताने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा 434 धावांनी पराभव करत मालिकेत 2 - 1 अशी आघाडी घेतली. भारताने 557 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव 122 धावात गुंडाळला. रविंद्र जडेजाने 5 तर कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या. अश्विन आणि बुमराहने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

भारताने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. रविंद्र जडेजाने शतकी खेळी केली होती. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 319 धावात संपवला. बेन डकेटने 153 धावांची धडाकेबाज खेली केली होती. त्यानंतर यशस्वी जैस्वालच्या 214 धावांच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात 430 धावा केल्या. इंग्लंडसमोर विजयासाठी 557 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र इंग्लंडचा संघ 122 धावात गारद झाला.

Ind vs Eng 3rd Test Day 4 Live Score : बुमराहनंतर जडेजाचा धमाका, इंग्लंड पराभवाच्या छायेत

अश्विननेही दुसऱ्या डावात विकेट्सचे खाते उघडले. त्याने 16 धावा करणाऱ्या हार्टलीला बाद करत इंग्लंडला नववा धक्का दिला.

Ind vs Eng 3rd Test Day 4 Live Score : बुमराहनंतर जडेजाचा धमाका, इंग्लंड पराभवाच्या छायेत

जडेजानंतर कुलदीप यादवने बेन स्टोक्सला बाद करत इंग्लंडला सहावा आणि मोठा धक्का दिला.

Ind vs Eng 3rd Test Day 4 Live Score : बुमराहनंतर जडेजाचा धमाका, इंग्लंडचा निम्मा संघ गारद

रविंद्र जडेजाने जो रूटला 7 धावांवर बाद करत पाचवा धक्का दिला. भारतीय संघ आजच सामना संपवण्यासाठी खेळताना दिसतोय.

Ind vs Eng 3rd Test Day 4 Live Score : बुमराहनंतर जडेजाचा डबल धमाका, इंग्लंडचा जवळपास निम्मा संघ गारद

चहापानानंतर खेळण्यासाठी आलेल्या इंग्लंडला रविंद्र जडेजाने पाठोपाठ दोन धक्के दिले. त्याने ओली पोपला 3 तर जॉनी बेअरस्टोला 4 धावांवर बाद केलं.

Ind vs Eng 3rd Test Day 4 Live Score : जसप्रीत बुमराहने खातं उघडलं; इंग्लंडचा दुसरा शिलेदार माघारी

भारताचे 557 धावांचे आव्हान घेऊन मैदानात आलेल्या इंग्लंडला पहिल्या 10 षटकातच दुसरा धक्का बसला. जसप्रीत बुमराहने झॅक क्राऊलीला 11 धावांवर बाद केलं. इंग्लंडचा चहापानापर्यंत अवस्था 2 बाद 18 धावा अशी झाली आहे.

Ind vs Eng 3rd Test Day 4 Live Score : इंग्लंडला पहिला धक्का; बेन डकेट 4 धावा करून माघारी

मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या बेन डकेटला 4 धावांवर धावबाद केलं. डकेटने पहिल्या डावात 153 धावांची धडाकेबाज खेळी केली होती.

Ind vs Eng 3rd Test Day 4 Live Score : यशस्वीचं द्विशतक, सर्फराजची फटकेबाजी! इंग्लंडसमोर विजयासाठी 557 धावांचे आव्हान

भारतीय संघाने आपला दुसरा डाव 4 बाद 430 धावांवर घोषित केला. भारताकडून यशस्वी जैस्वालने नाबाद 214 धावा तर सर्फराज खानने 68 धावांची नाबाद खेळी केली.

Ind vs Eng 3rd Test Day 4 Live Score : सर्फराज खानचं अर्दशतक तर यशस्वी जैस्वालचं धडाकेबाज द्विशतक

भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतक ठोकलं. त्याला साथ देणाऱ्या सर्फराज खानने देखील पदार्पणाच्या कसोटीतच दोन्ही डावात अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला.

Yashasvi Jaiswal becomes the first Indian to score 2 Double Hundreds against England in Tests.

nd vs Eng 3rd Test Day 4 Live Score : 22 वर्षाच्या यशस्वीनं इंग्लंडला कुटलं, सलग दुसऱ्या द्विशतकाच्या दिशेने कूच

भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. त्याने दमदार फलंदाजी करत 10 षटकार अन् 14 चौकारांसह 210 चेंडूत 186 धावा ठोकल्या.

Ind vs Eng 3rd Test Day 4 Live Score : 12 चौकार 7 षटकार.... जैस्वालने 'यशस्वी'रित्या ठोकल्या 150 धावा

दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला आहेत. यशस्वीच्या 150 धावा पूर्ण झाल्या आहेत. भारताने 325 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. सध्या भारताची आघाडी 450 धावांपेक्षा जास्त आहे.

Ind vs Eng 3rd Test Day 4 Live Score : गिलचे शतक हुकले पण चौथ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत भारताकडे 440 धावांची आघाडी!

चौथ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत भारताने चार गडी गमावून 314 धावा केल्या आहे. सध्या यशस्वी जैस्वाल 149 धावांवर तर सर्फराज 22 धावांवर खेळत आहे. दोघांनीही तुफानी फलंदाजी करत 62 चेंडूत 56 धावांची भागीदारी केली. टीम इंडियाची आतापर्यंत एकूण 440 धावांची आघाडी आहे. भारताने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला. भारताकडे 126 धावांची आघाडी होती.

Ind vs Eng 3rd Test Day 4 Live Score : शुभमनचे शतक हुकले! 258 धावांवर भारताला चौथा धक्का! भारताची आघाडी 400 धावा पार

258 धावांवर भारताला चौथा धक्का बसला आहे. कुलदीप यादव 27 धावा करून बाद झाला. त्याला रेहान अहमदने आऊट केले. सध्या यशस्वी जैस्वाल आणि सर्फराज खान क्रीजवर आहेत. भारताची आघाडी 410 धावांवर पोहोचली आहे. शुभमन गिल ९१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला होता.

Ind vs Eng 3rd Test Day 4 Live Score : शुभमनचे शतक हुकले! टीम इंडियाला 246 वर तिसरा धक्का, जैस्वाल पुन्हा आला मैदानात

टीम इंडियाला 246 धावांवर तिसरा धक्का बसला आहे. शुभमन गिल 91 धावा करून धावबाद झाला. सध्या यशस्वी जैस्वाल कुलदीप खेळत आहे. यशस्वी शनिवारी रिटायर्ड हर्ट झाला होता.

Ind vs Eng 3rd Test Day 4 Live Score : चौथ्या दिवसाचा खेळ सुरू 

चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. भारत दोन गड्यांच्या मोबदल्यात 196 धावांनी पुढे खेळत आहे. नाईट वॉचमन कुलदीप यादव चार धावा करून क्रीजवर आहे तर शुभमन गिल 67 धावा करून क्रीजवर आहे. भारताने 320 हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे.

Ind vs Eng 3rd Test Day 4 Live Score : काही वेळात सुरू होणार चौथ्या दिवसाचा थरार! यशस्वी जैस्वाल पुन्हा येणार फलंदाजीला?

राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शतक झळकावल्यानंतर यशस्वी जैस्वाल रिटायर्ड हर्ट झाला. अशा परिस्थितीत यशस्वी जैस्वाल पुन्हा फलंदाजी करू शकेल की नाही हे पाहू....

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Ind vs Eng : रिटायर्ड हर्ट की रिटायर्ड आऊट, राजकोट कसोटीत यशस्वी जैस्वाल पुन्हा करणार फलंदाजी? जाणून घ्या ICC चा नियम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Boycott on Election : महाराष्ट्रातील 10 लाख सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचा निवडणुकीवर बहिष्कार,का घेतला हा निर्णय ?

गस्तीला गुलाबी जीपमधून आली अन् घेतलं चुंबन, महिला पोलिसाच्या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल, प्रकरण काय?

Latest Maharashtra News Updates Live : अंधेरीतील भाजप नेते मुर्जी पटेल यांचा आज रात्री वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता

RRB Recruitment 2024: रेल्वेत तीन हजार जागांसाठी मेगाभरती; बारावी पास असलेल्यांना संधी, शेवटचे दोन दिवस

Diwali Recipe : बुंदी-बेसनाच्या फंदात पडू नका, दिवाळीला अगदी झटपट होणारे हे लाडू बनवा

SCROLL FOR NEXT