IND vs ENG 3rd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंड संघाने 2 गडी गमावून 207 धावा केल्या होत्या.
या सामन्यात टीम इंडियाला विकेट्सची गरज असून दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताच भारतीय संघ आणि चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली. स्टार फिरकी गोलंदाज आर अश्विन तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर गेला आहे आणि उर्वरित तीन दिवसांच्या खेळात तो संघाचा भाग बनू शकणार नाही.
भारतीय संघासाठी हा मोठा धक्का आहे. राजकोटमधील उरलेले तीन दिवस अश्विनशिवाय टीम इंडियासाठी जड जाणार आहेत. आर अश्विन बाहेर होताच रोहित शर्मा कोणता प्लॅन घेऊन मैदानात येणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. टीम इंडियाचे फिरकी युनिट कोणता गोलंदाज हाताळेल? अश्विनची जागा कोणाला घेता येईल का? हे जाणून घेऊया...
क्रिकेटमध्ये अनेकदा कसोटी सामन्याच्या मधून खेळाडू बाहेर जातो, पण असे झाल्यास काय केले जाते? खरं तर, अनेकदा खेळाडू दुखापतीमुळे किंवा वैयक्तिक कारणांमुळे कसोटी सामन्यातून बाहेर पडतात. अशा परिस्थितीत एखादा संघ त्या खेळाडूच्या बदलीची मागणी तेव्हाच करू शकतो जेव्हा विरोधी संघाचा कर्णधार तसे करण्यास परवानगी देतो.
पण नियम क्रमांक 1.2.1 नुसार, संघाच्या कर्णधाराला नाणेफेकीपूर्वी त्याच्या 12व्या खेळाडूचे नाव द्यावे लागते. जे टीम इंडियाने या सामन्यात केले नाही. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माची ती चुक टीम इंडियाच्या अंगलट आली आहे. म्हणजे टीम इंडिया 10 खेळाडू आणि एक बदली खेळाडू घेऊन मैदानात उतरेल.
अशा स्थितीत रोहित शर्माला इच्छा असूनही अश्विनची जागा कोणाला देता येणार नाही. इंग्लिश संघाच्या कर्णधाराने तसे करण्यास सहमती दर्शवली तरी, त्याच्या जागी दुसरा कोणताही खेळाडू खेळू शकत नाही, कारण टीम इंडियाने यापूर्वी नियम क्रमांक 1.2.1 पाळला नव्हता. अशा स्थितीत अश्विनचा पर्यायी क्षेत्ररक्षकच मैदानात खेळू शकतो. तो खेळाडू गोलंदाजी किंवा फलंदाजी करू शकणार नाही. त्याला फक्त क्षेत्ररक्षणातच कारता येईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.