Dhruv Jurel on Kuldeep Yadav Ollie Pope Wicket Video Marathi News sakal
क्रिकेट

Ind vs End : 'पुढे जातोय बघ...' धोनी'च्या स्टाईलमध्ये ध्रुव जरेलने ओली पोपला पाठवलं तंबूत

India vs England 5th Test : ध्रुव जुरेलने कुलदीप यादवला विकेटच्या मागून दिल्या टिप्स अन् पुढच्याच चेंडूवर....

Kiran Mahanavar

Dhruv Jurel on Kuldeep Yadav Ollie Pope Wicket Video : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना सुरू आहे. आज इंग्लंडचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आला. दरम्यान, कुलदीप यादवने उपाहारापूर्वी 2 विकेट घेत इंग्रजांना बॅकफूटवर ठेवले. विशेषतः जेव्हा त्याने दुसरी विकेट घेतली तेव्हा यष्टिरक्षक ध्रुव जरेलने आधीच संकेत दिले होते. यानंतर कुलदीप यादवनेही असेच केले आणि दुसरी विकेट घेतली.

खरंतर आज कुलदीप यादवने इंग्लंडच्या डावातील पहिली विकेट घेतली. जेव्हा त्याने बेन डकेटला झेलबाद केले. शुभमन गिलने मैदानात एक अप्रतिम झेल घेतला. जो सोपा दिसत असला तरी कठीण होता. बेन डकेटने 58 चेंडूत 27 धावांची छोटी खेळी खेळली. त्यादरम्यान त्याने 4 चौकार मारले. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ओली पोपलाही कुलदीप यादवने आपला शिकार बनवले.

जर तुम्ही क्रिकेटला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहित असेल एमएस धोनी विकेटच्या मागून गोलंदाजांना सांगत असतो. धरमशाला येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात ध्रुव जुरेलनेही इंग्लंडविरुद्ध असेच काहीसे केले. त्याने आधीच कुलदीप यादवला सांगितले की फलंदाज पुढे जातोय आणि नेमके तसेच घडले. ओपी पोप 23 चेंडूत केवळ 11 धावा करू शकला.

इंग्लंड संघाने मोठी धावसंख्या उभारण्यासाठी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कुलदीप यादव त्यांच्या आशा पल्लवित करताना दिसत आहे. बेन डकेटच्या रूपाने इंग्लंडची पहिली विकेट 64 धावांवर पडली. यानंतर ओली पोपही 100 धावांवर बाद झाला. दुसरी विकेट पडताच अंपायरने लंचची घोषणा केली. सध्या इंग्लंड संघ अडचणीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT