Ravichandran Ashwin Kuldeep Yadav ESAKAL
क्रिकेट

IND VS ENG 5th Test : पहले आप.. पहले आप... अश्विन अन् कुलदीपमध्ये प्रेमळ खडाजंगी, अखेर वरिष्ठांचा मान ठेवलाच!

Ravichandran Ashwin Kuldeep Yadav Beautiful Gesture : कुलदीप यादवने मनाचा मोठेपणा दाखवला मात्र अश्विनने वरिष्ठपणाचा अधिकार गाजवत चेंडू कुलदीपकडेच सोपवला.

अनिरुद्ध संकपाळ

Ravichandran Ashwin Kuldeep Yadav beautiful gesture India Vs England 5th Test : धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत-इंग्लंड कसोटी सामन्यात टीम इंडियाने चांगली सुरुवात केली आहे. नाणेफेक गमावूनही टीम इंडियाने सुरुवातीलाच सामन्यावर ताबा मिळवला.

डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव आणि आर अश्विन या जोडीने सामन्याच्या पहिल्या डावात बेसबॉलवर वर्चस्व गाजवले. या दोन्ही खेळाडूंनी मिळून पहिल्या डावात एकूण 9 विकेट घेतल्या. इंग्लंडची इनिंग संपल्यावर भारतीय संघ बाहेर जात असताना कुलदीप यादव आणि अश्विन यांच्याच प्रेमळ खडाजंगी झाली.

कुलदीपने इंग्लंडचा निम्मा संघ गारद केला तरी इनिंग संपल्यावर मैदानाबाहेर जाताना अश्विनला पुढे जाण्यास सांगितले मात्र अश्विन यास तयार नव्हता. यादरम्यान, या दोघांमध्ये प्रेमळ खडाजंगी देखील पहावयास मिळाली. अखेर अश्विचा मान ठेवून कुलदीपच पुढे गेला अन् पाच विकेट्स घेतलेला चेंडू उंचावून प्रेक्षकांचे अभिवादन स्विकारलं.

बीसीसीआयने आपल्या एक्स हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय इंग्लंडच्या चांगलाच अंगलट आला. पहिल्या सत्रात चांगली फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला दुसरे सत्र मात्र वाईट स्वप्नाप्रमाणे गेले. पहिल्या सत्रात दोन विकेट्स गमावणाऱ्या इंग्लंडने दुसऱ्या सत्रात मात्र तब्बल 6 विकेट्स गमावल्या. टी टाईमपर्यंत इंग्लंडची अवस्था 8 बाद 194 धावा अशी झाली होती. कुलदीप यादवने इंग्लंडचा निम्मा संघ गारद केला होता. अश्विननेही दोन विकेट्स घेतल्या होत्या.

चहापानानंतर अश्विनने इंग्लंडची शेपूट जास्त वळवळू दिली नाही. त्याने बेन फोक्सला 24 तर अँडरसनला शुन्यावर बाद करत इंग्लंडचा पहिला डाव 218 धावात संपुष्टात आणला. इंग्लंडचा पहिला डाव दोन सत्रात संपल्यानंतर भारताने आपल्या पहिल्या डावात दमदार सुरूवात केली.

सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी 104 धावांची शतकी भागीदारी रचली. अखेर ही भागीदारी बशीरने फोडली. त्याने जैस्वालला 57 धावांवर बाद केलं. त्यानंतर रोहितने आपले अर्धशतक पूर्ण करत शुभमन गिल सोबत दिवस अखेरपर्यंत भारताला 1 बाद 135 धावांपर्यंत पोहचवलं. भारत पहिल्या डावात अजून 83 धावांनी पिछाडीवर आहे.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT