Womens Asia Cup T20 IND vs PAK: आशिया करंडक विजेतेपद राखण्याची भारतीय महिलांची मोहीम आजपासून पाकिस्तानविरुद्धच्या लढतीने सुरू होत आहे. महिलांच्या या स्पर्धेत भारतीय संघाचे नेहमीच वर्चस्व राहिलेले आहे. यंदाचीही स्पर्धा त्यास अपवाद नसेल.
यंदाची स्पर्धा ५०-५० षटकांची (एकदिवसीय प्रकार) आहे. आत्तापर्यंत चार वेळा ५०-५० षटकांची ही स्पर्धा झाली त्यात चारही वेळा भारताने विजेतेपद मिळवलेले आहे तर चारपैकी तीन वेळा ट्वेन्टी-२० प्रकारात विजेतेपदाचा करंडक उंचावलेला आहे. गतवेळेस (२०२२) बांगलादेशचा पराभव करून हरमनप्रीतच्या भारतीय संघाने विजेतेपदाची मोहर उमटवली होती.
पाकिस्तानचा संघ भारतीयांसाठी पारंपरिक प्रतिस्पर्धी समजला जात असला तरी भारतीयांचे नेहमीच वर्चस्व राहिलेले आहे. १४ पैकी ११ सामन्यांत विजय मिळवलेला आहे. उद्या तोच पाकिस्तानचा संघ भारतासमोर आव्हान उभे करण्याचा विचार करत आहे; परंतु नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीमुळे भारतीयांचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला आहे.
दुसरीकडे पाकिस्तान संघ बऱ्याच काळानंतर मैदानात उतरणार आहे. मे महिन्यात त्यांची इंग्लंडविरुद्ध मालिका झाली होती, मात्र त्यात त्यांना ०-३ असा एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला होता.
स्पर्धेचा आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी वाढदिवस साजरा करणारी स्मृती मानधना कमालीची फॉर्मात आहे. ही भारतासाठी सर्वात मोठी जमेची बाजू आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तिचे सलग तिसरे शतक थोडक्यात हुकले होते. आफ्रिकेविरुद्धच्या याच मालिकेत वेगवान गोलंदाज पूजा वस्त्रकारने आठ विकेट मिळवल्या होत्या. तसेच, दीप्ती शर्मा, सजीवन सजना आणि श्रेयांका पाटील या फिरकी गोलंदाज भारतीय संघाची ताकद वाढवणाऱ्या आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत व्हाईटवॉश स्वीकारल्यानंतरही निदा दर हिच्यावर कर्णधार म्हणून पाक निवड समितीने विश्वास कायम ठेवला आहे. पाक संघात समावेश असलेल्या इराम जावेद, ओमाइमा सोहेल आणि सईदा अरुब शाह या तिघी जणी यंदाच्या वर्षात एकही सामना खेळलेल्या नाहीत. तसेच, तास्मिया रुबाब ही नवोदित खेळाडू आहे.
अ गट ः भारत, पाकिस्तान, नेपाळ, संयुक्त अरब अमिराती
ब गट ः बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, थायलंड
१९ जुलै ः विरुद्ध पाकिस्तान.
२१ जुलै ः विरुद्ध अमिराती.
२३ जुलै ः विरुद्ध नेपाळ
(भारताच्या सर्व लढती सायंकाळी सात वाजता सुरू होणार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.