Rohit Sharma Ind vs SL ODI Series Latest Marathi News sakal
क्रिकेट

Rohit Sharma : लेट्स मुव्ह ऑन! रोहित शर्मा असं का म्हणतोय? पाहा BCCI ने पोस्ट केलेला व्हिडीओ

Kiran Mahanavar

India vs Sri Lanka ODI Series : भारताने जूनमध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 वर्ल्ड कप 2024 वर कब्जा केला आणि 11 वर्षांनंतर ICC ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आणि अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा रोमहर्षक पद्धतीने पराभव केला.

ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहितने टीम इंडियासाठी सर्वात लहान फॉरमॅटला अलविदा केला. परंतु तो कसोटी आणि वनडेमध्ये आणखी खेळणार आहे. आता रोहित पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये दिसणार आहे, कारण टीम इंडियाला 2 ऑगस्टपासून श्रीलंका दौऱ्यावर एकदिवसीय मालिका खेळायची आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह अनेक खेळाडूंना टी-20 वर्ल्ड कपनंतर विश्रांती मिळाली होती. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी हे सर्वजण परतणार नाहीत, असे मानले जात होते. परंतु चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी केवळ 6 एकदिवसीय सामने असल्याने नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी रोहित आणि कोहली यांच्याशी बोलून त्यांना मालिका खेळण्यासाठी राजी केले. यामुळे दोघेही परतले. आता रोहितने टी-20 वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियासोबत नवीन सुरुवात केल्याची चर्चा आहे.

श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने एक शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा म्हणाला की, "किती भारी महिना होता. जो एक क्षण आयुष्यभर आपल्यासोबत राहील. बऱ्याच अंशी, मला अजूनही वाटत होतं की, मी लहान फॉरमॅटमध्ये खेळत आहे. पण आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. आमच्यासाठी पुन्हा मैदानात उतरण्याची वेळ आली आहे. एका नव्या युगासह, नवीन प्रशिक्षकासह एक नवीन सुरुवात. अशी भागीदारी जी आता भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर घेऊन जाईल. पुढे जाण्याची हीच वेळ आहे, त्याच उर्जेने आणि उत्साहाने टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरेल आणि हा तुमचा कर्णधार रोहित शर्मा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update: शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! राज्यात पुन्हा सक्रिय पावसाची शक्यता, पुणे-मुंबईत काय असेल परिस्थिती?

आजचे राशिभविष्य - 20 सप्टेंबर 2024

अग्रलेख : एकदाच काय ते...

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

SCROLL FOR NEXT