India vs Sri Lanka Sakal
क्रिकेट

IND vs SL, 3rd ODI: श्रीलंकेने जिंकला टॉस! भारताकडून रियान परागचं पदार्पण, तर 'या' खेळाडूंना डच्चू; पाहा प्लेइंग इलेव्हन

India vs Sri Lanka Playing XI: श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेतून भारताकडून रियान परागने पदार्पण केले आहे, तर ऋषभ पंतचेही पुनरागमन झाले आहे.

Pranali Kodre

India vs Sri Lanka, 3rd ODI: श्रीलंका विरुद्ध भारत संघात तिसरा आणि अखेरचा वनडे सामना बुधवारी खेळवला जात आहे. कोलंबोला होत असलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. ऋषभ पंत आणि रियान पराग यांना केएल राहुल आणि अर्शदीप सिंग यांच्याजागेवर संधी देण्यात आली आहे.

परागचे हे वनडे पदार्पण आहे. त्याला त्याच्या पदार्पणाची कॅप विराट कोहलीच्या हस्ते देण्यात आली. तो भारताकडून पदार्पण करणारा २५६ वा खेळाडू ठरला. त्याने यापूर्वी गेल्या महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यातील टी२० मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

याशिवाय ऋषभ पंतचेही वनडेमध्ये तब्बल २१ महिन्यांनंतर पुनरागमन झाले आहे. त्याने अखेरचा वनडे सामना ३० नोव्हेंबर २०२२ रोजी खेळला होता.

दरम्यान श्रीलंकेनेही प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. श्रीलंकेने प्लेइंग इलेव्हनमध्ये अकिला धनंजयाच्या जागेवर महिशा तिक्षणाला संधी देण्यात आली आहे.

निर्णयाक सामना

हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. या दोन्ही संघातील पहिला सामना बरोबरीत सुटला होता, तर दुसरा सामना श्रीलंकेने जिंकला होता. त्यामुळे जर तिसरा सामना आता श्रीलंकेने जिंकला, तर ते ही मालिकाही जिंकतील. मात्र, जर भारताने विजय मिळवला तर मालिकेत १-१ अशी बरोबरी होईल.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

  • भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, रियान पराग, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

  • श्रीलंका: पाथम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असालंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, कामिंडू मेंडिस, दुनिथ वेल्लालागे, महेश तिक्षणा, जेफ्री वाँडरसे, असिथा फर्नांडो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT