Team India | 3rd T20I Sakal
क्रिकेट

IND vs SL, 3rd T20I: ४ आले, ४ गेले! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बघा आज कोणाला बसवले

India Playing XI: श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तब्बल चार बदल करण्यात आले आहेत.

Pranali Kodre

India vs Sri lanka Playing XI: भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी२० मालिकेचा तिसरा आणि अखेरचा सामना मंगळवारी (३० जुलै) खेळला जात आहे. हा सामना पाल्लेकेले येथे होत असून पावसाच्या अडथळ्यामुळे एक तास उशीराने म्हणजेच रात्री ८ वाजता या सामन्याला सुरुवात झाली आहे.

या मालिकेतील पहिले दोन्ही सामना भारतीय संघाने जिंकले असल्याने मालिका विजय देखील आधीच निश्चित केला आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्याच्या निकालाचा मालिकेच्या निकलावर फारसा परिणाम होणार नसल्याने भारतीय संघ व्यवस्थापनेने प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल केले आहेत.

तिसऱ्या टी२० सामन्यासाठी भारतीय संघव्यवस्थापनेने हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, ऋषभ पंत आणि अर्शदीप सिंग यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्याऐवजी शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, खलील अहमद आणि शिवम दुबे यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

गिलला दुसऱ्या सामन्यापूर्वी मानेमध्ये वेदना असल्याने त्या सामन्यात खेळता आले नव्हते. मात्र आता त्याचं तिसऱ्या सामन्यात पुनरागमन झालं आहे. याशिवाय वॉशिंग्टन सुंदर, खलील अहमद आणि शिवम दुबे हे देखील पहिल्या दोन्ही सामन्यात खेळले नव्हते. पण आता त्यांना तिसऱ्या सामन्यासाठी संधी मिळाली आहे.

दरम्यान, तिसरा सामना जिंकून श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्याची संधी भारताला असणार आहे. तसेच श्रीलंकाही मायदेशात प्रतिष्ठा राखण्यासाठी तिसऱ्या सामन्यात विजयासाठी पूर्ण प्रयत्न करताना दिसेल.

तिसऱ्या टी२० सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन -

भारत: यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, खलील अहमद

श्रीलंका: पाथम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरिथ असलंका (कर्णधार), चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महेश तिक्षणा, मथिशा पाथिराना, असिथा फर्नांडो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT