Matheesha Pathirana and Dilshan Madushanka ruled out sakal
क्रिकेट

IND vs SL ODI Series : वन डे मालिकेपूर्वी मोठा धक्का, दोन खेळाडूंनी घेतली माघार; उद्या पहिला सामना

Big Blow India vs Sri Lanka ODI Series : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ३ सामन्यांच्या वन डे मालिकेत श्रीलंकेचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. पण...

Swadesh Ghanekar

India vs Sri Lanka ODI Series - भारत-श्रीलंका यांच्यातल्या वन डे मालिकेला २ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. भारतीय संघाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी-२० मालिका जिंकली आणि आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वन डे मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. ट्वेंटी-२० मालिकेत यजमान श्रीलंकेच्या ३ खेळाडूंना दुखापत व आजारपणामुळे माघार घ्यावी लागली होती. तेच सत्र वन डे मालिकेत कायम राहिलेले दिसत आहे. पहिल्या वन डे सामन्यापूर्वी श्रीलंकेच्या दोन जलदगती गोलंदाजांनी मालिकेतून माघार घेतली आहे.

मथिशा पथिराणाला खांद्याच्या दुखापतीमुळे आणि दिलशान मदुशंकाला हॅमस्ट्रींगमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. या मालिकेत आधीच श्रीलंकेला दुश्मंथा चमिरा आणि नुवान तुषारा यांच्याशिवाय खेळावे लागत आहे. चमिराने आजारपणामुळे आणि तुषाराने बोट फ्रँक्चर झाल्यामुळे ट्वेंटी-२० मालिकेतून माघार घेतली आहे.

आता श्रीलंकेने या मालिकेसाठी अनकॅप्ड गोलंदाज मोहम्मद शिराजचा संघात समावेश केला आहे आणि टीम मॅनेजर महिंदा हलागोंडा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ''मथिशाच्या खांद्याला दुखापत जाणवत आहे आणि मागच्या वर्षी वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान त्याला याच समस्येचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आम्हाला कोणता धोका पत्करायचा नाही,''असे महिंदा म्हणाले. ट्वेंटी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला ही दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले.

मदुशंकाला सरावादरम्यान हॅमस्ट्रींगची समस्या उद्भवली... ट्वेंटी-२० मालिकेत तो केवळ एकच सामना खेळला होता. त्याच्याजागी इशान मलिंगाची संघात निवड झाली आहे.

भारताचा वन डे संघ: रोहित शर्मा (कर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग , अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.

श्रीलंकेचा वन डे संघ - चरिथ असलंका ( कर्णधार), पथूम निसंका, अविष्का फर्नांडो, कुशल मेंडिस, सदीरा समराविक्रमा, कमिंदू मेंडिस, जनिथ लियानागे, निशान, वनिंदू हसरंगा, दुमिथ वेल्लालागे, चमिका करुणारत्ने, महीष थिक्षणा, अकिला धनंजया, इशान मलिंगा, मोहम्मद शिराज, असिथा फर्नांडो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

Latest Maharashtra News Updates live : दिवाळीनंतर कार्यकर्त्यांची दिवाळी

SCROLL FOR NEXT