RohitShamra Virat Kohli GG sakal
क्रिकेट

IND vs SL : हे फ्रँचायझी क्रिकेट नव्हे! Ro-Ko ला मॅनेज करण्यापूर्वी गौतम गंभीरला वॉर्निंग; जाणून घ्या नेमकं काय

India vs Sri Lanka - भारत-श्रीलंका यांच्यात आज तिसरी ट्वेंटी-२० लढत होणार आहे. यानंतर तीन सामन्यांची वन डे मालिका होणार आहेत.

Swadesh Ghanekar

India vs Sri Lanka ODI Series - नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याच्या मार्गदर्शनाखाली आणि नवीन कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने पहिली ट्वेंटी-२० मालिका जिंकली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आज मालिकेतील तिसरा ट्वेंटी-२० सामना होणार आहे आणि या मालिकेनंतर भारत-श्रीलंका वन डे मालिका होणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली हे सीनियर खेळाडू परतणार आहेत आणि त्यांना मॅनेज करणं हे गंभीरसमोरील आव्हान असणार आहे.

२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या IND vs SL वन डे मालिकेसाठी रोहित, विराट, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, लोकेश राहुल व हर्षित राणा हे खेळाडू कोलंबोत दाखल झाले आहेत. त्यांनी काल सराव सत्रातही सहभाग घेतला. गौतम गंभीरच्या विनंतीनंतर रोहित व विराट ही वन डे मालिका खेळण्यासाठी सुट्टी लवकर संपवून कोलंबो येथे दाखल झाले आहे. या सीनियर खेळाडूंना हँडल करणे सोपं नसेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

या मालिकेपूर्वी सूत्राने ESPN cricinfo कडे बोलताना गौतम गंभीरला वॉर्निंग दिली आहे. या दोघांना ड्रेसिंग रुममध्ये नीट हाताळले गेले पाहिजे असेही सूत्राचे म्हणणे आहे.

ESPNCricinfo नुसार, सूत्राने दावा केला की गंभीरचे सर्वात मोठे आव्हान हे सीनियर खेळाडूंना सामोरे जाणे असेल. नवीन मुख्य प्रशिक्षकाला सांगण्यात आले की, भारतीय राष्ट्रीय संघाला प्रशिक्षण देणे हे फ्रँचायझी क्रिकेट नव्हे. जिथे खेळाडूंना अधिकाराने काय करावे हे सांगू शकतो. सूत्राने असा दावा केला की माजी प्रशिक्षक राहुल द्रविडलाही सुरुवातीला या मुद्यावरून जुळवून घेणे कठीण गेले असेल.

“हे सोपे काम नाही. हे फ्रँचायझी मॉडेलसारखे नाही, जिथे तुम्ही बॉस आहात आणि तुम्ही अटी लादू शकता. पण, ते भारतीय क्रिकेटमध्ये चालणार नाही. भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये तुम्हाला फोन उचलावा लागेल, खेळाडूंशी बोलावे लागेल आणि द्रविडने हे चांगल्या पद्धतीनं केलं,” असे सूत्राने ESPNCricinfo ला सांगितले.

वन डे मालिका कोलंबोमध्ये २ ऑगस्टपासून सुरू होत असून तिन्ही सामने आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. ४ आणि ७ ऑगस्टला दुसरी व तिसरी वन डे होईल.

भारताचा वन डे संघ: रोहित शर्मा (सी), शुभमन गिल (विकेटकीपर), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग , अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT