Ind vs SL ODI Series SAKAL
क्रिकेट

Ind vs SL ODI Series : ऋषभ पंत की केएल राहुल... कोणाला मिळेल संधी? रोहित-विराट धमाका करण्यास सज्ज

Kiran Mahanavar

Sri Lanka vs India 1st ODI : श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत निर्भेळ यश मिळवल्यानंतर भारतीय संघ आता एकदिवसीय मालिकेतही असेच यश मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. ट्वेन्टी-२० विश्वकरंडक विजेतेपदानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली प्रथमच मैदानात उतरणार आहेत.

श्रीलंकेविरुद्धची ही एकदिवसीय मालिका आजपासून सुरू होत आहे. रोहित आणि विराट यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहेच; परंतु यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंत की केएल राहुल हा प्रश्न गौतम गंभीर यांच्या संघ व्यवस्थापनाला सोडवावा लागणार आहे.

ट्वेन्टी-२० मधील निवृत्तीनंतर रोहित आणि विराट आता एकदिवसीय आणि कसोटी या दोनच प्रकारात खेळणार आहेत. चॅम्पियन्स करंडक स्पर्धा अजून दूर असली तरी तयारीसाठी पहिले पाऊल ठरू शकेल म्हणून या मालिकेला महत्त्व आहे. संघ रचना कशी असायला हवी, हेसुद्धा यातून निश्चित होणार आहे.

यष्टीरक्षक म्हणून कोणाला प्राधान्य द्यायचे हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. त्यासाठी वर्कलोडचाही विचार केला जाईल. मोठ्या अपघातातून वाचल्यानंतर तेवढ्याच जिद्दीने पुनरागमन करणाऱ्या पंतने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. भारताला पुढील काही महिन्यात कसोटी मालिकाही खेळायच्या आहेत. तेथे पंतला प्राधान्य असणार आहे. तसेच, आता वेगवेगळे संघ तयार करण्याचाही विचार सुरू झाला आहे, त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेसाठी राहुलला संधी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे.

राहुलने एकदिवसीय प्रकारात चांगली कामगिरी केलेली आहे. २१ सामन्यांतून ६९.५०च्या सरासरीने ८३४ धावा यात दोन शतकांचा समावेश आहे. तसेच, या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात रोहित शर्मा अनुपलब्ध असताना त्याने नेतृत्वही केलेले आहे.

राहुल की पंत असा विचार होत असला तरी गंभीर आणि रोहित या दोघांनाही अंतिम संघात स्थान देऊ शकतात. तसे झाल्यास श्रेयस अय्यरला संधी द्यायची की नाही, हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. श्रीलंकेतील फिरकीस साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांचा विचार करता रियान परागलाही संधी मिळू शकते. श्रेयस अय्यर प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करत आहे, त्यामुळे त्याला प्राधान्य मिळू शकले. विशेष म्हणजे, तोही संधीच्या शोधात आहे.

निवृत्त झाल्याचे वाटतच नाही ः रोहित

ट्वेन्टी-२० प्रकारातून निवृत्त झाल्यानंतर प्रथमच मैदानात उतरणार आहेस, याबाबत काय वाटते, असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारल्यानंतर रोहित हसत हसत म्हणाला, या प्रकारातून निवृत्त झालोय, असे वाटतच नाही. केवळ विश्रांती घेतलीय असाच समज होतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna Accident: भीषण दुर्घटना! जालना-वडीगोद्री मार्गावर एसटी बस अन् ट्रकची टक्कर, ५ जणांचा मृत्यू

ही वाट्टेल तशी खेळते आणि... मीरा जग्गनाथने अंकितावर साधला निशाणा; पण नेटकऱ्यांनी घेतली तिचीच शाळा

ENG vs AUS 1st ODI : २५ चेंडूंत ११० धावा! Travis Head ला रोखणं झालंय अवघड; ख्रिस गेल स्टाईल सेलिब्रेशन

Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; निफ्टी 25,500च्या वर, मिडकॅप निर्देशांक तेजीत

Assembly Election : राजू शेट्टी, संभाजीराजेंसमोर 'होमपीच'वरच आव्हान; उमेदवार ठरवताना तिसऱ्या आघाडीची लागणार कसोटी

SCROLL FOR NEXT