Sri Lanka announced a 16-member squad sakal
क्रिकेट

Sri Lanka squad vs India : नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली श्रीलंका भारताला टक्कर देणार, जाहीर केला संघ

Sri Lanka's squad for India - भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी यजमान श्रीलंकेने आज त्यांचा तगडा संघ मैदानावर उतरवला आहे.

Swadesh Ghanekar

Sri Lanka's squad for the T20I series against India - भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी यजमान श्रीलंकेने आज त्यांचा तगडा संघ मैदानावर उतरवला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ३ सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी १६ सदस्यीय संघाची घोषणा मंगळवारी केली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आलेल्या अपयशानंतर वनिंदू हसरंगाने कर्णधारपद सोडले होते आणि आता भारताविरुद्ध चरिथ असलंका ( Charith Asalanka) हा श्रीलंकेचा कर्णधार असणार आहे.

क्रीडा व युवा कल्याण मंत्री हरीन फर्नांडो यांनी या संघाला मान्यता दिली आहे. भारत-श्रीलंका यांच्यात २७, २८ आणि ३० जुलै असे ३ ट्वेंटी-२० सामने होणार आहेत. माजी कर्णधार वानिंदू हसरंगा अजूनही संघाचा एक भाग आहे. संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी सनथ जयसूर्याकडे आहे. हसरंगाने अलीकडेच लंका प्रीमियर लीगमध्ये एकूण १५ विकेट्स घेतल्या होत्या. अनुभवी अँजेलो मॅथ्यूजला या संघातून वगळले आहे, तर दासुन शनाका संघात परतला आहे.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत स्थान न मिळालेला दिनेश चंडीमल या मालिकेतून ट्वेंटी-२० संघात परतला आहे. चेन्नई सुपर किंग्जचे स्टार खेळाडू मथिशा पाथिराना आणि महिषा थिक्षाना यांनाही संधी मिळाली आहे. या दोघांनी लंका प्रीमियर लीगमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. पाथिरानाने ९ सामन्यांत १५ विकेट्स घेतल्या होत्या आणि सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर होता. तर थिक्षानाने एकूण १० विकेट घेतल्या.

श्रीलंकेचा ट्वेंटी-२० संघ : चरिथ असलंका (कर्णधार), पथूम निसांका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वनिंदू हसरंगा, दुनिथ वेलागे, महेश थिक्षाना, चामिंडू विक्रमसिंघे, चमिंडू विक्रमसिंघे, मथिसा पथिराना, बिनुरा फर्नांडो.

भारताचा ट्वेंटी-२० संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT