India vs Sri Lanka 2nd T20I : सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा सहज पराभव केला आणि तीन ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला 9 बाद 161 धावांत गुंडाळल्यावर पावसाचा व्यत्यय आला त्यामुळे भारतासमोर 8 षटकांत 78 धावांचे समीकरण देण्यात आले. भारताने या धावा 6.3 षटकांतच पूर्ण केल्या त्यासाठी केवळ तीन फलंदाज गमावले. टीम इंडियाच्या या विजयाबाबत कॅप्टन सूर्यकुमार यादवने मोठे वक्तव्य केले आहे.
या सामन्यात संजू सॅमसनला सलामीची संधी देण्यात आली होती. मात्र तो खाते न उघडता शून्यावर बाद झाला. यानंतर यशस्वी जैस्वालने 15 चेंडूत 30 धावा, सूर्यकुमार यादवने 12 चेंडूत 26 धावा आणि हार्दिक पांड्याने 9 चेंडूत 22 धावा करत संघाला सहज विजय मिळवून दिला.
सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने टीम इंडियाच्या या जबरदस्त विजयावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, टूर्नामेंटपूर्वीच आम्ही कोणत्या प्रकारचे क्रिकेट खेळायचे याबद्दल बोललो होतो. जरी ते लहान लक्ष्य असेल किंवा आम्ही जे काही लक्ष्य पाठलाग करत असू, आम्ही समान टेम्प्लेटसह फलंदाजी करू. हवामानाचे प्रकार लक्षात घेता, 160 च्या खाली स्कोअर चांगला राहिला असता. पावसामुळे आम्हाला फायदा झाला. या सामन्यानंतर आम्ही आमच्या बेंच स्ट्रेंथबाबत निर्णय घेऊ.
भारताने मालिका जिंकली असून आता आणखी एक सामना बाकी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.