Rohit Sharma is likely to be available ODI series Sakal
क्रिकेट

India squad for Sri Lanka Tour : वन डे मालिकेतील कर्णधाराचा प्रश्न रोहित शर्माच्या एका निर्णयाने सुटणार; आज फैसला होणार

Swadesh Ghanekar

India squad for Sri Lanka Tour : गौतम गंभीरच्या ( Gautam Gambhir) मार्गदर्शनाखाली टीम इंडिया पहिल्या दौऱ्यासाठी श्रीलंकेला जाणार आहे. ३ ट्वेंटी-२० व ३ वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी आज टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदासाठी सूर्यकुमार यादव ( Surya Kumar Yadav) याचे नाव आघाडीवर आहे, कारण गौतम व निवड समितीला हार्दिक पांड्याच्या फिटनेवर अजूनही हवा तसा विश्वास नाही. तेच रोहित शर्माच्या अनुपस्थितीत वन डे संघासाठी लोकेश राहुल ( KL Rahul) हे नाव कर्णधार म्हणून चर्चेत आहे. सीनियर्सनी वन डे मालिकेत खेळावे, असा गौतमचा आग्रह आहे आणि रोहित त्याबाबत सकारात्मक दिसतोय.

BCCI ने मंगळवारी दुपारी आयोजित केलेल्या बैठकीत अजित आगरकर यांच्या निवड समितीचे सदस्य, गंभीर आणि सचिव जय शहा यांचा समावेश होता. गंभीरने नुकतेच सांगितले की त्याला तिन्ही फॉरमॅटसाठी सर्व खेळाडू उपलब्ध हवे आहेत, परंतु मीटिंग दरम्यान त्याने या मुद्द्यावर आग्रह धरला नाही. पण, रोहित शर्मा ऑगस्टमध्ये होणाऱ्या तीन वन डे सामन्यांसाठी स्वत:ला उपलब्ध करून देऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.

फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला खेळण्यासाठी फार वन डे सामने नाहीत आणि ही गोष्ट लक्षात घेता रोहित श्रीलंका दौऱ्यावर खेळण्याचा निर्णय घेऊ शकतो. सध्या तो अमेरिकेत सुट्टीवर आहे आणि बुधवारी ऑनलाइन होणाऱ्या बैठकीपूर्वी तो त्याचा निर्णय बीसीसीआयला कळवू शकतो. रोहितने खेळण्याचा निर्णय घेतला तर तो संघाचे नेतृत्व करेल. मात्र, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली या खेळाडूंना श्रीलंका मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

गेल्या वर्षी भारतात झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत मधल्या फळीत दमदार कामगिरीर करणाऱा श्रेयस अय्यर, केएल राहुलसह पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. जर रोहितने मालिकेत खेळण्यास नकार दिला तर लोकेशकडे नेतृत्व जाऊ शकते. भारतीय संघ २७ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत श्रीलंका दौऱ्यावर असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT