IND vs ZIM 2024 4th T20I Playing 11  sakal
क्रिकेट

Zim vs Ind 4th T20I : मराठमोळा पठ्ठ्या करणार चौथ्या टी-20 मॅचमध्ये टीम इंडियात पदार्पण; 'या' खेळाडूचा पत्ता कट?

Zimbabwe vs India 4th T20I Match : आता मालिका विजयाचे लक्ष्य! भारत-झिम्बाब्वेमध्ये आज चौथी टी-२० लढत

Kiran Mahanavar

IND vs ZIM 2024 4th T20I Playing 11 : शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय युवा क्रिकेट संघाचे लक्ष्य झिम्बाब्वेमध्ये टी-२० मालिका जिंकण्याचे असणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाकडे २-१ अशी आघाडी असून दोन देशांमधील चौथा सामना आज (ता. १३) रंगणार आहे. याप्रसंगी भारतीय संघ शनिवारीच मालिका विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करेल, तर यजमान झिम्बाब्वेचा संघ मालिका २-२ अशी बरोबरीत राखण्यासाठी मैदानात उतरताना दिसेल.

रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांच्या निवृत्तीनंतर भारतीय संघातील जागा रिकाम्या झाल्या. युवा खेळाडूंमध्ये आता भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. अभिषेक शर्मा याने दुसऱ्या टी-२० लढतीत धडाकेबाज शतक झळकावत आपले नाणे खणखणीत वाजवले आहे, पण यशस्वी जयस्वालच्या आगमनानंतर त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यावे लागले. शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड हे खेळाडू गेली काही वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहेत. दोघांकडूनही अपेक्षा आहेत. त्यामुळे दोघांच्या संघातील स्थानांना धोका नाही.

संजू सॅमसन व शिवम दुबे हे खेळाडू विश्‍वकरंडक जिंकलेल्या भारतीय संघाचे सदस्य होते. पहिल्या दोन लढतींत ते खेळू शकले नाहीत. त्यामुळे उर्वरित दोन लढतींमध्ये त्यांना आपली चमक दाखवावी लागणार आहे. असे झाल्यास भारताच्या टी-२० संघात ते यापुढेही कायम राहू शकणार आहेत. टी-२० संघाचा कणा बनण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नक्कीच आहे.

वॉशिंग्टन सुंदरकडून आशा

रवींद्र जडेजा याने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. त्यामुळे आता टी-२० क्रिकेटसाठी भारतीय संघात एका अष्टपैलू फिरकी गोलंदाजाला स्थान मिळू शकते. अक्षर पटेल याच्यासह वॉशिंग्टन सुंदर या स्थानासाठी प्रबळ दावेदार आहे. रवी बिश्‍नोईच्या प्रभावी फिरकीसमोर झिम्बाब्वेच्या फलंदाजांचा निभाव लागत नाही. भारताच्या टी-२० संघात कुलदीप यादव, युझवेंद्र चहल यांच्यासह रवी बिश्‍नोई आपले स्थान पक्के करू शकतो.

तुषार देशपांडेला स्थान मिळणार?

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या तीन टी-२० सामन्यांत आवेश खान, मुकेश कुमार व खलील अहमद या वेगवान गोलंदाजांना संधी मिळाली. अद्याप मुंबईकर गोलंदाज तुषार देशपांडे याला संधी देण्यात आलेली नाही. उर्वरित दोन लढतींमध्ये तरी त्याला संधी देण्यात येते का, या ‍प्रश्‍नाचे उत्तर लवकरच मिळेल.

यजमान संघाचा मार्ग खडतर

यजमान झिम्बाब्वे संघाने पहिल्या टी-२० लढतीत विजय मिळवला, पण पुढील दोन लढतींमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता मालिका विजयासाठी उर्वरित दोन लढतींमध्ये त्यांना यश मिळवण्याची गरज आहे, मात्र झिम्बाब्वेच्या सध्याच्या फॉर्मवरून त्यांचा मार्ग खडतर असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे.

आज चौथी टी-२० लढत! भारत-झिम्बाब्वे, हरारे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT