Shardul Thakur Instagram
क्रिकेट

Shardul Thakur Surgery: शार्दुल ठाकूरवर झाली सर्जरी, पुन्हा क्रिकेटच्या मैदानात कधी करणार पुनरागमन?

Shardul Thakur: भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या पायावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Pranali Kodre

Shardul Thakur Surgery: भारताचा स्टार वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याबद्दल त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. शार्दुल ठाकूरच्या उजव्या पायाच्या घोट्याची लंडनमध्ये शस्त्रक्रिया झाली आहे.

शार्दुलने शस्त्रक्रियेनंतरचा फोटो शेअर केला असून त्याला कॅप्शन दिले आहे की 'यशस्वी शस्त्रक्रिया जून २०२४ वि. मे २०१९' खरंतर २०१९ मध्येही शार्दुलला शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले होते.

यावर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावेळी शार्दुलच्या दुखापतीने डोके वर काढले होते. पण त्यानंतरही त्यानं खेळणे मॅनेज केलं होतं. त्याने मुंबईला ४२ व्यांदा रणजी ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाचा वाटाही उचलला होता.

तसेच तो आयपीएल २०२४ मध्येही चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला. दरम्यान आयपीएलनंतर पुन्हा देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम सुरू होण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी आहे. सप्टेंबरमध्ये भारतातील देशांतर्गत क्रिकेटचा नवा हंगाम सुरू होईल. त्यामुळे तोपर्यंत शार्दुलला विश्रांतीची संधी आहे.

त्याला या दुखापतीतून बाहेर येण्यासाठी साधारण तीन महिन्यांचा काळ लागण्याची शक्यता आले. त्यामुळे तो सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान पुन्हा क्रिकेट खेळताना दिसू शकतो. पण त्याच्या पुनरागमनाबाबत अद्याप कोणाकडूनही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.

दरम्यान, तो बीसीसीआयच्या वार्षिक करारात सी श्रेणीत असल्याने त्याच्या उपचारांचा खर्च बीसीसीआयकडून करण्यात येणार आहे.

शार्दुल अखेरीस आयपीएल २०२४ मध्ये खेळला आहे. त्याने ९ सामन्यांत ५ विकेट्स घेतल्या होत्या.

शार्दुलने आत्तापर्यंत ११ कसोटी सामने खेळले असून ३१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर ४ अर्धशतकांसह ३३१ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ४७ वनडेत ६५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर ३२९ धावा केल्या आहे. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये २५ सामन्यांत ३३ विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Chh.Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT