india U19 team esakal
क्रिकेट

IND vs AUS U19: भारताच्या छोट्या उस्तादांनी कसोटीत नोंदवला 'वर्ल्ड रेकॉर्ड'; एकाच डावात ८ खेळाडूंची दांडी गुल

IND vs AUS U19 Test series: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय १९ वर्षाखालील संघाने २-०नो विजय मिळवला आहे.

सकाळ डिजिटल टीम

India U19 Team make world Record: भारतीय १९ वर्षाखालील संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात नवा विक्रम रचला आहे. या सामन्यामधील दुसऱ्या डावात भारताने ८ खेळाडूंना त्रिफळाचीत केले. एकाच डावात ८ फलंदाजांना 'बोल्ड' (त्रिफळाचीत) करणारा भारतीय १९ वर्षाखालील संघ पहिला संघ ठरला आहे. तर भारताने या डावात ऑस्ट्रेलियाच्या ४ खेळाडूंना शून्यावर बाद केले. भारताने या सामन्यात १२० धावांना विजय मिळवून मालिका २-० ने जिंकली.

३० सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने २ विकेट्सने विजय मिळवला. तर दुसरा सामना भारताने १२० धावांना जिंकत नवा विक्रम रचला आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या सलामी फलंदाजांना यश आले नाही. परंतु त्यानंतरच्या फलंदाजांनी धमाकेदार कामगिरी केली. नित्या पांड्या (९४), केपी कार्थीकेया (७१), कर्णधार सोहम पटवर्धन (६३), निखील कुमार (६१), तर हरवंश पंगालियाने ११७ धावा करत शतक झळकावले. भारताने पहिल्या डावात ४९२ धावा उभारल्या.

ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांना भारतीय गोलंदाजांनी स्वस्तात माघारी पाठवले. परंतु क्रमांकावर ऑलिव्हर पीकने(१७७) शतकी खेळी केली. पिकने ऑस्ट्रलियाची खेळी सावरण्याचा प्रयत्न केला. अ‍ॅलेक्स ली यंगने त्याला (६६) साथ दिली. परंतु या दोघांच्या व्यतिरीक्त कोणत्याही फलंदाजाचा भारतीय गोलंदाजी समोर निभाव लागू शकला नाही. भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रलियाचा डाव २७७ धावांवर आटपला. या डावात मोदम्मद इनान आणि अमोलजीत सिंगने प्रत्येकी ४ विकेट्स घेतले.

भारताने दुसरा डाव जाहीर करून ऑस्ट्रेलियाला पुन्हा खेळण्यास सांगितले. या डावात भारताने नवा विक्रम रचला. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या ८ फलंदाजांना त्रिफळाचीत करत ऑस्ट्रेलियाला केवळ ९५ धावांवर गुंडाळले आणि सामना १२० धावांनी जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: गणेश नाईक हजार 25 हजार 52 एवढ्या मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT