Rohit Sharma | Cricket Sakal
क्रिकेट

Rohit Sharma: मुंबईच्या 'लोकल'ने मला टफ केलं...; रोहितनं सांगितलं कशी झाली क्रिकेटची सुरुवात अन् का घेतली T20I निवृत्ती

Pranali Kodre

Rohit Sharma Opens Up About His Cricket Journey: भारताचा धडाकेबाज फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्माने आत्तापर्यंत क्रिकेटमध्ये मोठे योगदान दिले आहे. त्याने अनेक अविस्मरणीय खेळी करताने अनेक मोठे विक्रम रचले आहेत. आता तो ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्याही जवळ आहे. यानिमित्ताने तो नुकताच त्याच्या क्रिकेटमधील प्रवासाबाबत व्यत्त झाला आहे.

जितेंद्र चोक्सी यांच्या युट्युब चॅनेलशी बोलताना रोहितने क्रिकेटची सुरुवात कशी झाली, मुंबईतील क्रिकेटसाठीचे कष्ट आणि आता आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील निवृत्ती यावर भाष्य केले आहे.

रोहितने सांगितले की 'आम्ही आमच्या सोसायटीच्या बिल्डिंगखाली खेळायचो. मुंबईत जागेची कमी आहे. त्यामुळे तुम्हाला आहे त्याच मॅनेज करावे लागते. मी माझ्या मित्रांबरोबर खेळायला सुरूवात केली, मी शाळेच्या मिश्रांबरोबरही खेळायचो. बिल्डिंगमधल्या मित्रांबरोबर मी मजा म्हणून खेळायचे. मला तेव्हा माहित नव्हतं की मी इथपर्यंत पोहचेल. तेव्हा मी ९ वर्षाचा असेल आणि आता तेव्हापासून जवळपास २८-२९ वर्षे होऊन गेली आहे की मी क्रिकेट खेळत आहे.'

त्याचबरोबर क्रिकेटमध्ये करियर करणे सोपे नव्हते असंही रोहितने सांगितले. काहीवेळा त्याचा आभ्यासावरही परिणाम झाला, बराच प्रवास करावा लागला. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक कणखरपणाचीही गरज असते, असंही रोहित म्हणाला. रोहितने यावेळी लोकल प्रवासाबद्दलही सांगितले.

तो म्हणाला, 'या खेळाच्या खुप डिमांड्स असतात, मग त्या प्रवासाच्या असो, कौशल्य शिकण्याच्या असो, फिटनेस, ट्रेनिंग असे अनेक. मुंबईमध्ये जर तुम्हाला क्रिकेटपटू बनायचे असेल, तर तुम्हाला २ तासाचा तरी ट्रेन प्रवास करून ५-६ तास खेळायचे असते आणि नंतर पुन्हा प्रवास करत परत जायचे असते.'

'तुम्हाला माहित नसते की तुम्हाला बसायला सीट मिळणार आहे की नाही. याचा माझ्यावर शारीरिक आणि मानसिक परिणाम झाला. पण मी त्याचा आनंद लुटला आणि या कठीण प्रवासाने मला कणखर बनवलं. त्यामुळे मी आज जसा आहे, तसा आहे. आज मला कठीण निर्णय घ्यायला त्याची मदत होते.'

फिटनेस महत्त्वाचा - रोहित

याबरोबरच साधारण १७ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याबद्दलही रोहितने भावना व्यक्त केल्या. त्याने फिटनेसला महत्त्व दिले.

तो म्हणाला, '१७ वर्षे खेळणे आणि आता मी भारतासाठी ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या जवळ आहे, हा टप्पा जगातील खूप कमी क्रिकेटपटूंना गाठता येतो. इतकी वर्षे खेळण्यामागे महत्त्वाचे कारण तुमचे रुटीन हे देखील आहे. तुम्ही तुमचा फिटनेस कसा सांभाळता, तुम्ही तुमची मानसिकता कशी सांभाळता, तुम्ही स्वत:ला कसं ट्रेन करता हे आहे.'

'महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सामन्यासाठी कसे तयार असता. शेवटी आमचं काम हेच आहे की सामन्यासाठी १०० टक्के सज्ज असणे आणि सामना जिंकण्यासाठी योगदान देणे. त्यासाठी फिटनेस महत्त्वाचा आहे.'

Rohit Sharma

आंतरराष्ट्रीय टी२० मधून का घेतली निवृत्ती?

रोहित शर्माने टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे तो सध्या फक्त वनडे आणि कसोटी क्रिकेट भारतासाठी खेळतो. त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली याबाबतही खुलासा केला.

रोहित म्हणाला, 'मी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यामागे एकच कारण होते ते म्हणजे माझी वेळ आता संपली होती. मी या प्रकारात खेळण्याचा आनंद घेतला. मी १७ वर्षे खेळलो आणि चांगली कामगिरीही केली.'

'मी वर्ल्ड कप जिंकला होता आणि मला वाटले की हीच पुढे जाण्यासाठी आणि बाकी गोष्टींकडे आता लक्ष देण्यासाठी योग्य वेळ आहे. आता अनेक चांगले खेळाडू आहेत, जे भारतासाठी चांगली कामगिरी करू शकतात. मला वाटले की खरंच ही योग्य वेळ होती.'

रोहितने २००७ आणि २०२४ असे दोन वेळा टी२० वर्ल्ड कप जिंकले आहेत. त्याने २००७ मध्ये खेळाडू म्हणून, तर २०२४ मध्ये कर्णधार म्हणून टी२० वर्ल्ड कप जिंकला. रोहितने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १५१ सामन्यांमध्ये ३२.०५ च्या सरासरीने आणि ५ शतकांसह ४२३१ धावा केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Politics : भाजप, काँग्रेस हे पक्ष बिहारचे खरे गुन्हेगार... प्रशांत किशोर यांचा घणाघात; नितीश कुमारांवरही साधला निशाणा

Musheer Khan: गंभीर अपघातानंतर भारतीय क्रिकेटर मुशीर खानने वडिलांसह पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; जाणून घ्या काय म्हणाला

Assembly Elections: ठाकरे गट उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार? बड्या नेत्याने दिवसच सांगितला! काय म्हणाले?

Latest Maharashtra News Updates: पुतळा उभारण्यातही तुम्ही पैसे खाल्ले आहेत - ठाकरे

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन! सायबर गुन्हेगारांचे फसवणुकीचे ‘हे’ 10 फंडे; सोशल मीडियावरील बंद असलेले खाते डिलीट करण्याचाही सल्ला

SCROLL FOR NEXT