Rohit Sharma News: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी 19 नोव्हेंबर 2023 ही तारीख नेहमीच लक्षात राहिल, कारण याचदिवशी भारतीय क्रिकेट संघ वर्ल्डकपचा अंतिम सामना पराभूत झाला. याचबद्दल आता भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.
भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 दरम्यान वनडे वर्ल्डकप खेळवण्यात आला होता. या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने सलग 10 विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.
पण अहमदाबादला झालेल्या अंतिम सामन्यात भारताला पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया संघाने 6 विकेट्सने पराभूत केले होते. त्यामुळे तिसऱ्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकण्याचे भारताचे स्वप्न तुटले होते.
या पराभवामुळे भारतीय संघातील खेळाडूंसह चाहतेही अंत्यत नाराज झाले होते. मात्र चाहत्यांकडून भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत केलेल्या कामगिरीचे कौतुकही करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्वाधिक 765 धावा करणाऱ्या विराट कोहलीने मालिकावीर पुरस्कारही जिंकला होता.
आता याबाबतच रोहितने 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या कार्यक्रमादरम्यान भाष्य केले आहे. या कार्यक्रमात त्याच्यासह श्रेयस अय्यरही उपस्थित होता.
दरम्यान, रोहित म्हणाला, 'सामन्याच्या दोन दिवस आधी आमचा संघ अहमदाबादमध्ये होता आणि आम्ही आमचा सराव केला होता. आमचा संघ चांगल्या लयीत होता. जेव्हा सामना सुरू झाला, तेव्हा आम्ही चांगली सुरुवात केली होती.'
'शुभमन गिल लवकर बाद झाला, पण मी आणि विराटने चांगली भागीदारी केली होती. आम्हाला विश्वास होता की आम्ही चांगली धावसंख्या उभारू.'
'मला वाटते की मोठ्या सामन्यांमध्ये जेव्हा तुम्ही मोठ्या धावा करता आणि प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकता, तेव्हा ती फायद्याची गोष्ट असते, कारण अशावळी कोणताही संघ दाबावाखाली खचण्याची शक्यता असते. मात्र, ऑस्ट्रेलियाने चांगले क्रिकेट खेळले. आम्ही तीन विकेट्स साधारण 40 धावांच्या आसपास घेतले होते, पण त्यानंतर त्यांनी मोठी भागीदारी केली.'
रोहितने चाहत्यांकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली. तो म्हणाला, 'मी विचार करत होतो की वर्ल्डकप आपल्या देशात होत होता, पण आम्ही तरीही जिंकू शकलो नाही. मला भीती वाटलेली की देश आमच्यावर रागावलेला असेल. पण मी फक्त लोकांना आम्ही किती चांगले खेळलो आणि त्यांनी क्रिकेट पाहण्याची किती आनंद घेतला, याबद्दलच बोलतान ऐकले.'
अंतिम सामन्यात भारताने 50 षटकात सर्वबाद 240 धावा केल्या होत्या. भारताकडून केएल राहुलने 66 धावांची खेळी केली, तर विराटने 54 धावा केल्या. तसेच रोहितने 47 धावा केल्या होत्या.
त्यानंतर 241 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने 43 षटकात 4 विकेट्स गमावत पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने 137 धावांची खेळी केली होती. त्याच्यात आणि मार्नस लॅब्युशेन (58*) यांच्यात चौथ्या विकेटसाठी 192 धावांची भागीदारी झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.