India Tour Of England 2025, Test Series: भारतीय संघ पुढीलवर्षी जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेचे वेळापत्रक इंग्लंड क्रिकेट आणि बीसीसीआयने घोषित केले आहे. ही मालिका २० जून ते ४ ऑगस्ट २०२५ दरम्यान खेळवली जाणार आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने गुरुवारी महिला आणि पुरुष संघांचे आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वेळापत्रक घोषित केले. यामध्ये भारताविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेचाही समावेश आहे. ही मालिका कसोटी चॅम्पिययनशीचाही भाग असणार आहे.
या कसोटी मालिकेतील पहिला सामना २० जूनला लीड्स येथे सुरू होईल. त्यानंतर २ जुलै रोजी बर्मिंगहॅमला दुसरा सामना सुरू होईल. तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर खेळला जाणार असून हा सामना १० जुलैला सुरू होईल. चौथा सामना मँचेस्टरला २३ जुलैला सुरू होणार आहे, तर अखेरचा सामना लंडनला ओव्हलवर ३१ जुलैला सुरू होईल.
हे पाचही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होणार आहेत.
२० ते २४ जून - पहिला कसोटी सामना; हेडिंग्ले, लीड्स
२ ते ६ जुलै - दुसरा कसोटी सामना; एजबस्टन, बर्मिंगहॅम
१० ते १४ जुलै, तिसरा कसोटी सामना; लॉर्ड्स, लंडन
२३ ते २७ जुलै - चौथा कसोटी सामना; ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
३१ जुलै ते ४ ऑगस्ट - पाचवा कसोटी सामना; द किया ओव्हल, लंडन
दरम्यान, भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. इंग्लंडला भारत दौऱ्यात वनडे आणि टी२० मालिका खेळायची आहे. या दौऱ्यात इंग्लंड आणि भारत संघात ५ सामन्यांची टी२० मालिका आणि ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांना पुढच्यावर्षी भारत आणि इंग्लंड संघात मोठ्या चूरशीचे सामने पाहायला मिळण्याची अपेक्षा असेल.
टी20 मालिका (वेळ - संध्या. ७.०० वाजता)
२२ जानेवारी - पहिला टी२०, चेन्नई
२५ जानेवारी - दुसरा टी२०, कोलकाता
२८ जानेवारी - तिसरा टी२०, राजकोट
३१ जानेवारी - चौथा टी२०, पुणे
२ फेब्रुवारी - पाचवा टी२०, मुंबई
वनडे मालिका (वेळ - दु. १.३० वाजता)
६ फेब्रुवारी - पहिला वनडे, नागपूर
९ फेब्रुवारी - दुसरा वनडे, कटक
१२ फेब्रुवारी - तिसरा वनडे, अहमदाबाद
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.