Hardik Pandya - Suryakumar Yadav Sakal
क्रिकेट

ICC T20I Ranking: हार्दिक पांड्याला 'बढती'; अर्शदीप सिंगची टॉप १० मध्ये एन्ट्री अन् वॉशिंग्टनलाही फायदा

Pranali Kodre

latest ICC T20I Rankings: भारत विरुद्ध बांगालदेश संघात सध्या टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील ग्वाल्हेरला झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ७ विकेटन्सने विजय मिळवला होता.

या विजयानंतर आता बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ताजी टी२० क्रिकेट क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर आणि हार्दिक पांड्या यांना मोठा फायदा झाला आहे. या तिघांनीही ग्वाल्हेरला झालेल्या टी२०मध्ये शानदार कामगिरी केली होती.

हार्दिकने या सामन्यात १६ चेंडूत आक्रमक नाबाद ३९ धावा केल्या होत्या. तसेच एक विकेटही घेतली होती. त्यामुळे आता तो फलंदाजांच्या यादीत ७ स्थानांची उडी घेत ६० व्या क्रमांकावर आला आहे.

याशिवाय तो अष्टपैलू खेळांडूंच्या क्रमवारीत चार स्थानांची उडी घेत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत त्याच्या पुढे अव्वल क्रमांकावर इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोन आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर नेपाळचा दिपेंद्र सिंग ऐरे आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या १० मध्ये तो एकमेव भारतीय आहे. त्याच्यानंतर अक्षर पटेल ११ व्या क्रमांकावर आहे.

फलंदाजांच्या यादीत मात्र पहिल्या १० मध्ये तीन भारतीय खेळाडू आहेत. भारताचा टी२० कर्णधार सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तसेच यशस्वी जैस्वाल मात्र एका स्थानाने घसरून पाचव्या क्रमांकावर आला आहे. ऋतुराज गायकवाड ९ व्या स्थानी कायम आहे. फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा ट्रेविस हेड आहे.

अर्शदीप टॉप १०मध्ये

गोलंदाजांच्या यादीत अर्शदीप सिंगला मोठा फायदा झाला असून त्याने ८ स्थानांची झेप घेत पुन्हा पहिल्या १० जणांमध्ये स्थान मिळवलं आहे. त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम ६४३ रेटिंग पाँइंट्स मिळवत आता एन्रिच नॉर्कियासह आठवे स्थान मिळवले आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर इंग्लंडला आदील राशिद आहे.

रवी बिश्नोई एका स्थानाने घसरून १२ आणि अक्षर पटेल ३ स्थानांनी घसरून १५ व्या क्रमांकावर आले आहेत. तसेच वॉशिंग्टन सुंदरनेही चार स्थानांची प्रगती करत ३५ वे स्थान मिळवले आहे. हार्दिक पांड्याही गोलंदाजांच्या यादीत ९ स्थानांची झेप घेत ५८ व्या क्रमांकावर आला आहे. दरम्यान पहिल्या १० जणांमध्ये अर्शदीप एकमेव भारतीय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates : रतन टाटा यांची प्रकृती स्थिर

Swine Flu: महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचा धोका वाढला; मलेरियानेही डोकं वर काढलं

Nitish Kumar Reddy, रिंकू सिंगची तुफान फटकेबाजी; भारताने बांगलादेशविरुद्ध उभारला द्विशतकीय डोंगर

PM Modi: फोर्टिफाईड तांदळाचं देशभरात होणार मोफत वितरण; केंद्र सरकारचा निर्णय, १७ हजार कोटींचा खर्च

INDW vs SLW : Smriti Mandhana, हरमनप्रीत कौरची वादळी खेळी; शफाली वर्माची फटकेबाजी, वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम धावसंख्या

SCROLL FOR NEXT