Virat Kohli, Rohit Sharma, Mohammed Siraj Sakal
क्रिकेट

IND vs BAN: भारताचा मोठा विजय; तरी रोहित, विराट, शाकीब, रहीमचे अपयश खटकले

India vs Bangladesh 1st Test: भारत विरुद्ध बांगलादेश संघात चेन्नईमध्ये पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, शाकीब अल हसन, मुश्‍फीकूर रहीम अशा अनुभवी खेळाडूंना खास कामगिरी करता आली नाही.

सुनंदन लेले saptrang@esakal.com

India vs Bangladesh Chennai Test: चेन्नईत पार पडलेल्या कसोटीत भारताने बांगलादेशला पराभूत करीत दोन कसोटी सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. निकाल अपेक्षेप्रमाणे लागला. या कसोटीत दोन्ही संघांतील वरिष्ठ खेळाडूंना आलेले अपयश बोचणी देणारे ठरले.

रोहित शर्मा व विराट कोहली या भारतीय आणि शाकीब अल हसन व मुश्‍फीकूर रहीम या बांगलादेशच्या खेळाडूंना पहिल्या कसोटीत सूर गवसला नाही.

भारताने भला मोठा २८० धावांचा विजय मिळवला तरी एका जुन्या मुद्द्याला परत वाचा फुटली. दोनही संघातील सर्वात अनुभवी फलंदाजांना कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात आलेले अपयश क्रिकेट जाणकारांना खटकले.

होय रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासोबत बांगलादेशचे शाकीब अल हसन आणि मुश्फीकूर रहीमला दोनही डावात मोठ्या धावा उभारता आल्या नाहीत. हे मान्य करावे लागेल की रोहित शर्मा आणि विराट कोहलीने अनावश्यक मोठे फटके मारताना विकेट बहाल केल्या नाहीत, पण शाकीबने पहिल्या डावात आणि मुश्फीकूर रहीमने दुसऱ्या डावात अनावश्यक मोठे फटके मारताना विकेट गमावल्याने निराशा निर्माण झाली.

रोहित शर्मा सहापेक्षा जास्त महिन्यांच्या कालावधीनंतर लाल चेंडूचे क्रिकेट खेळत होता. विराट कोहलीने तर त्याच्या अगोदर दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामना खेळला होता. मग एकदम कसोटी क्रिकेट खेळण्यापेक्षा एक तरी दुलीप करंडकाचा सामना विराट कोहली आणि रोहितने खेळायला पाहिजे होता, असेच आग्रही म्हणणे बऱ्याच क्रिकेट जाणकारांचे आहे.

दोन्ही डावात विराट कोहली आणि रोहित शर्माला दर्जेदार क्रिकेट सामन्याच्या सरावाची उणीव जाणवली, असे स्पष्ट जाणवले. भारतीय संघ व्यवस्थापन याविषयी टीका टिप्पणी करणार नाही उलट ते खेळाडूंची पाठराखणच करतील आणि दोन्ही खेळाडूंच्या प्रदीर्घ अनुभवाचा दाखला देतील.

एका कसोटी सामन्यातल्या कामगिरीवरून ज्येष्ठ खेळाडूंच्या संघातील जागेला धक्का लागेल असे वाटत नसले तरी चेन्नई कसोटीत फलंदाजी करताना अनुभवी खेळाडू कमी पडले आणि तरुण खेळाडू बहरताना दिसले हे नक्की आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ कानपूरला एकत्र येऊन दुसऱ्या कसोटी सामन्याची तयारी चालू करणार आहे.

शाकीब हसनवर टीका

बांगलादेशमधून आलेल्या ४० पत्रकारांना शाकीब अल हसन मन लावून कसोटी सामना खेळत नसल्याची शंका त्रास देत आहे. त्यातून वयाची ३७ वर्षे पार केलेल्या शाकीब अल हसनला एका डोळ्याला काहीतरी आजार असल्याने चेंडू स्पष्ट न दिसण्याची समस्या आहे. चेन्नई कसोटीत शाकीबला काहीतरी दुखापत होती तरी तो खेळत होता अशीही शंका वर्तवली गेली.

स्वभावाला आणि गरजेला मागे ठेवून शाकीब अल हसन कसोटी सामन्यात रिव्हर्स स्वीप खेळताना बाद झाल्याने राग अजून उफाळून आला आणि बांगलादेशी पत्रकाराने चेन्नई कसोटी सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत शाकीब अल हसनला कसोटी संघात घेतले पाहिजे का नाही, असा सवाल उपस्थित केला.

बांगलादेशकडून अपेक्षाभंग

चेन्नई कसोटी सामन्यात भारतीय संघाने अपेक्षेप्रमाणे बांगलादेशविरुद्ध भला मोठा विजय मिळवून दोन सामन्यांच्या मालिकेला झकास सुरुवात केली. बांगलादेश संघाचा भारताच्या दौऱ्यावर आल्यावर झालेला सामान्य खेळ सगळ्यांना एक गोष्ट दाखवत होता ते म्हणजे बांगलादेशी खेळाडू गुणवत्तेला न्याय देत नाहीत आणि त्यांच्या खेळात सातत्य नाही.

सामन्याअगोदरपासून बांगलादेश संघ भारताला चांगला खेळ करून माफक टक्कर देईल इतकीच अपेक्षा वाटत होती. त्यातून बांगलादेशने पाकिस्तानला सलग दोन कसोटी सामन्यात पराभूत करून भारताच्या दौऱ्याला प्रारंभ केल्याने अपेक्षा अजून वाढल्या होत्या. कागदावर बांगलादेशचा संघ आतापर्यंत दौऱ्यावर आलेल्या अगोदरच्या संघापेक्षा सक्षम समतोल वाटत होता, मात्र पुन्हा एकदा बांगलादेशी संघाने कचखाऊ खेळ केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kangana Ranaut: महाराष्ट्राचा निकाल लागताच कंगनानं उद्धव ठाकरेंना दैत्य संबोधलं! म्हटलं...

IPL 2025 Mega Auction Highlights: पहिला दिवस संपला! स्टार खेळाडूंनी भाव खाल्ला; अनेक खेळाडू झाले मालामाल

Nilesh Rane : आमदार होताच निलेश राणेंची धमकी, म्हणाले, ...तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करु

IND vs AUS 1st Test: ४ बाद, १७ धावा! टीम इंडियाचा दरारा; ऑस्ट्रेलियात मोडला ११३ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम

Latest Maharashtra News Updates : हेमंत रासने यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

SCROLL FOR NEXT