Team India Sakal
क्रिकेट

IND vs ZIM: तिसऱ्या T20I साठी भारताच्या प्लेइंग-11 मध्ये बदल निश्चितच! जयस्वाल, दुबे अन् सॅमसनला मिळणार संधी?

India vs Zimbabwe, 3rd T20I: झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणे निश्चित आहे.

Pranali Kodre

India Predicted Playing XI: भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात टी२० मालिकेतील तिसरा सामना बुधवारी (१० जुलै) होणार आहे. हरारे येथे हा सामना खेळवला जाणार आहे. सध्या ५ सामन्यांची ही मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यातून आघाडी घेण्याची संधी दोन्ही संघांना असणार आहे.

भारतीय संघात बदल निश्चित

तिसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाशी टी२० वर्ल्ड कप विजेत्या संघातील यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन आणि शिवम दुबे हे तीन खेळाडू जोडले गेले आहेत. त्यामुळे साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा हे खेळाडू भारतीय संघातून बाहेर झाले आहेत.

यातील साई सुदर्शनला दुसऱ्या टी२० सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली होती. मात्र आता त्याला ही जागा सोडावी लागणार आहे. त्याच्या जागेवर तिसऱ्या सामन्यात यशस्वी जयस्वालला संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे फलंदाजी क्रमवारीतही बदल होऊ शकतो.

जयस्वाल कर्णधार शुभमन गिलसह सलामीला फलंदाजी करू शकतो, तर दुसऱ्या टी२०मधील शतकवीर अभिषेक शर्मा तिसऱ्या क्रमांकावर, तर ऋतुराज गायकवाड चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरू शकतो. त्याचबरोबर संजू सॅमसनही संघात आल्याने ध्रुव जुरेलला त्याची जागा सोडावी लागू शकते.

सॅमसन पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. तसेच रिंकू सिंग सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरू शकतो. तर शिवम दुबे रियान परागची जागा घेऊ शकतो. याव्यतिरिक्त बदल होण्याची शक्यता कमी आहे. गोलंदाजीत वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान आणि मुकेश कुमार हे कायम राहू शकतात.

या मालिकेत जवळपास सर्वच युवा खेळाडू खेळताना दिसत असल्याने भविष्याच्या दृष्टीने त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष आहे.

तिसऱ्या टी२० सामन्यासाठी संभावित प्लेइंग इलेव्हन

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकु सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT