Sanju Samson - Suryakumar Yadav | India vs Bangladesh 3rd T20I Sakal
क्रिकेट

IND vs BAN, 3rd T20I: दसऱ्याच्या दिवशी टीम इंडियाची आतषबाजी! सॅमसनचं शतक, तर सूर्याची फिफ्टी अन् विक्रमी २९७ धावांचा डोंगर

Pranali Kodre

India vs Bangladesh, 3rd T20I: भारतीय संघाने दसऱ्याच्या दिवशीच चौकार - षटकारांची बसरसात करत क्रिकेट प्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले आहेत. शनिवारी (१२ ऑक्टोबर) भारत विरुद्ध बांगलादेश संघात तिसरा टी२० सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू आहे.

या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद तब्बल २९७ धावांचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे आता बांगलादेशसमोर विजयासाठी २९८ धावांचे आव्हान असणार आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील कोणत्याही संघाने उभारलेली ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. अव्वल क्रमांकावर नेपाळ असून त्यांनी मंगोलियाविरुद्ध २०२३ मध्ये २० षटकात ३ बाद ३१४ धावा केल्या होत्या.

तसेच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील ही भारताची सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी भारताने २०१७ मध्ये इंदूरला श्रीलंकेविरुद्ध ५ बाद २६० धावा केल्या होत्या.

हैदराबादला झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारताने सलामीवीर अभिषेक शर्माची विकेट तिसऱ्याच षटकात गमावली. तो ४ धावांवरच बाद झाला.

परंतु सलामीला खेळायला आलेला संजू सॅमसन आधीच आक्रमक खेळत होता. त्याला नंतर कर्णधार सूर्यकुमार यादवचीही साथ मिळाली. या दोघांनी पॉवरप्लेमध्येच भारताला ८२ धावा करून दिल्या. त्यामुळे पहिल्या पॉवरप्लेमधील भारताच्या या सर्वाधिक धावा ठरल्या. या दोघांनी ४३ चेंडूत भारताला १०० धावांचा टप्पाही पार करून दिला.

दरम्यान, १० व्या षटकात रिशाद हुसैनविरुद्ध सॅमसनने सलग ५ षटकारही मारले. त्यामुळे भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारेल, अशी लक्षात आले होते. दरम्यान ४० चेंडूत सॅमसनने शतक केले. तो सर्वात कमी चेंडूत शतक करणारा रोहित शर्मानंतरचा (३५ चेंडू) दुसरा भारतीय फलंदाज ठरला.

त्यानंतरही तो आक्रमक खेळत होता. पण अखेर त्याला १४ व्या षटकात मुस्तफिजूर रेहमानने बाद केले. सॅमसनने ४७ चेंडूत ११ चौकार आणि ८ षटकारांसह १११ धावा केल्या. त्याच्यानंतर आक्रमक खेळणारा सूर्यकुमारही १५ व्या षटकात बाद झाला. त्याने ३५ चेंडूत ७५ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ५ षटकार मारले.

सूर्यकुमार आणि सॅमसन यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी १७३ धावांची भागीदारी झाली. हे दोघे बाद झाल्यानंतरही रियान पराग आणि हार्दिक पांड्या यांनी आक्रमक खेळ केला. रियान १३ चेंडूत ३४ धावांची खेळी केली.

हार्दिकने आक्रमण करताना १८ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ४७ धावांची खेळी केली. पण अखेरच्या षटकात मोठे फटके मारायच्या नादात तो बाद झाला. त्याच्यापाठोपाठ नितीश रेड्डीही शुन्यावर बाद झाला. रिंकु सिंग ८ धावांवर नाबाद राहिला.

बांगलादेशकडून तान्झिम हसन साकिबने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच तस्किन अहमद, मुस्तफिजूर आणि महमुद्दुलाह यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder : बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात? पकडलेल्या दोघांपैकी एक यूपी तर दुसरा हरियानाचा

CM on Baba Siddique: सिद्दीकी हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार; एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक करणार तपास; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Baba Siddiqui: कार्यक्रमाला उपस्थिती, फटाके फोडताना साधला डाव, वाचा बाबा सिद्धिकींचा हत्येचा थरार!

Baba Siddiqui Case: ...हे मोठं षडयंत्र; बाबा सिद्दिकींची हत्या चिंतेची बाब, भाजप नेत्याची प्रतिक्रिया

Samir Khan: नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता अपघात

SCROLL FOR NEXT