india squad for sri lanka tour 2024 bcci yuzvendra chahal sakal
क्रिकेट

India Squad vs SL Tour : एकही सामना न खेळता टीम इंडियातून स्टार खेळाडूला डच्चू! BCCIने परतीचे मार्ग केले बंद?

India Squad For Sri lanka Tour 2024 : बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठी वनडे आणि टी-20 संघाची घोषणा केली आहे.

Kiran Mahanavar

India Squad For Sri lanka Tour 2024 : बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठी वनडे आणि टी-20 संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्मानंतर सूर्यकुमार यादवला टीम इंडियाचा टी-20 कर्णधार बनवण्यात आले आहे. तर रोहित शर्मा वनडे संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. याशिवाय शुभमन गिलला वनडे आणि टी-20चा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. पण स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहलला या संघात संधी मिळालेली नाही.

युजवेंद्र चहलला टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे. मात्र, त्याला या स्पर्धेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतही त्याचा समावेश नव्हता. यानंतर श्रीलंका दौऱ्यावर त्याची निवड होईल अशी अपेक्षा होती, परंतु त्याला कोणत्याही टी-20 आणि एकदिवसीय संघात स्थान मिळाले नाही.

आयपीएलमध्ये चहलने राजस्थान रॉयल्सकडून चांगली कामगिरी केली होती. त्याने 15 सामन्यात 18 विकेट घेतल्या होत्या. संजू सॅमसनला जेव्हा जेव्हा विकेट गरज होती तेव्हा चहल त्याची विकेट घेत होता. डेथ ओव्हर्समध्येही त्याने चांगली गोलंदाजी केली. यानंतरही त्याला टी-20 आणि ODI मध्ये कोणत्याही संघात स्थान मिळालेले नाही.

टीम इंडिया सध्या युवा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईला सतत संधी देत ​​आहे. या संधीचे त्याने दोन्ही हातांनी सोने केले आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठीही त्याची निवड झाली आहे. पण आता चहलच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत चहलसाठी आता टीम इंडियात पुनरागमन करणे कठीण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT