Abhishek Sharma, Riyan Parag, Tushar Deshpande Sakal
क्रिकेट

IND vs ZIM: टीम इंडियाची घोषणा झाली! तब्बल 4 खेळाडूंना एकाच मालिकेत पदार्पणाची मिळणार संधी?

India Tour of Zimbabwe: बीसीसीआयने आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी दिली असून 4 जणांना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी असणार आहे.

Pranali Kodre

India squad for Zimbabwe Tour: सोमवारी (24 जून) बीसीसीआयने आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या दौऱ्यात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे.

सध्या चालू असलेल्या टी20 वर्ल्ड कपनंतर लगेचच हा दौरा होणार असल्याने अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या यांनाही संघात स्थान मिळालेले नसल्याने कर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गिलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

तसेच या संघात अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, तुषार देशपांडे आणि रियान पराग या चार युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता या चौघांनाही भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी असणार आहे.

या चौघांनीही गेल्या काही काळात देशांतर्गत क्रिकेट गाजवले आहे. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या आयपीएल 2024 स्पर्धेतही या चौघांचीही कामगिरी चांगली झाली होती. त्यामुळे त्यांची लवकरच भारतीय संघात निवड होऊ शकते, अशी चर्चा होती. अखेर त्यांना त्यांच्या कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे.

टी20 क्रिकेटमधील कामगिरी

रियान परागने त्याच्या कारकिर्दीत 114 टी20 सामने खेळले असून 22 अर्धशतकांसह 2616 धावा केल्या आहेत. तसेच 41 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर नितीश रेड्डीने 20 टी20 सामने खेळले असून 395 धावा केल्या आहेत आणि 3 विकेट्स घेतल्या आहेत.

अष्टपैलू अभिषेक शर्माने 104 टी20 सामने खेळले असून 3 शतकांसह 2671 धावा केल्या आहेत आणि 32 विकेट्स घेतल्या आहेत. वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याने 80 टी20 सामने खेळले असून 116 विकेट्स घेतल्या आहेत.

ध्रुवचेही टी20 पदार्पण?

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेललाही संधी देण्यात आली आहे. त्याने यापूर्वीच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. पण आता त्याला झिम्बाब्वे दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पणाची संधी असणार आहे.

असा आहे भारतीय संघ - शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नितीश रेड्डी, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार , तुषार देशपांडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Parenting Tips: पालकांच्या 'या' चांगल्या सवयींमुळे मुले होतात शिस्तबद्ध, तुम्हीही करू शकता फॉलो

Mumbai High Court : १८ वर्षाखालील पत्नीशी संबंधही बलात्काराच, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai: काँग्रेसचा 'मुंबईनामा' अदानींना धक्का? पोस्टरवर सोनिया गांधींच्या जागी बाळासाहेबांचा मोठा फोटो, काय आहे जाहीरनाम्यात ?

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

SCROLL FOR NEXT