India vs Australia Test Series Sakal
क्रिकेट

IND vs AUS: भारताच्या सामन्यांची ऑस्ट्रेलियातही क्रेझ; मेलबर्नमधील ‘बॉक्सिंग डे’ कसोटीच्या तिकीटांची तिप्पट विक्री

सकाळ वृत्तसेवा

India vs Australia Boxing Day test: जेथे भारतीय क्रिकेट संघ तेथे अधिक लोकप्रियता हे समीकरण आता ऑस्ट्रेलियातही तयार झाले आहे. गावसकर-बॉर्डर करंडक मालिकेतील सामना बॉक्सिंग डे (२६ डिसेंबर) पासून सुरू होणार आहे आणि या दिवसाची ऑनलाइन तिकीट विक्री तिपटीने वाढली.

९० हजार प्रेक्षकसंख्या असलेले मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत-ऑस्ट्रेलियामधील कसोटी सामना २६ ते ३० डिसेंबरदरम्यान होत आहे. या सामन्यास अजून तीन महिने शिल्लक आहेत; परंतु त्याची ऑनलाइन तिकीट विक्री सुरू झाली आणि पहिल्या दिवसाच्या तिकीट विक्रीने उच्चांक गाठला.

बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला एक वेगळेच महत्त्व असते. नाताळच्या दुसऱ्या दिवशी हा सामना सुरू होत असतो. भारतीय संघ जेथे जेथे खेळत असतो तेथे कमालीची उत्सुकता असते. मग त्यांचे सामने देशात असो वा परदेशात.

भारताच्या २०१८-१९ मधील दौऱ्यातही बॉक्सिंग डे दिवशी मेलबर्न येथे सामना झाला होता, त्या सामन्याच्या तुलनेत यंदा तिप्पट तिकीट विक्री झाली आहे. ॲशेस मालिकेपेक्षाही भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेला महत्त्व प्राप्त झालेले आहे आणि ऑस्ट्रेलिया संघासाठी ही मालिका प्रतिष्ठेची आहे. त्यांना आत्तापासूनच या मालिकेचे वेध लागलेले आहेत.

पाचही कसोटी सामन्यांची तिकीट विक्री वेगात सुरू आहे. अधिकाधिक प्रेक्षकांना सामना पाहण्याची संधी मिळावी, म्हणून आम्ही आत्तापासूनच ऑनलाइन तिकीट विक्री सुरू केली आहे. त्याचा फायदा भारतातून पर्यटन करणाऱ्या प्रेक्षकांनाही होऊ शकेल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या इव्हेंट्स आणि ऑपरेशन विभागाचे सरव्यवस्थापक ज्योएल मॉरिसन यांनी सांगितले.

या मालिकेतील पाच कसोटी सामने अनुक्रमे पर्थ, ॲडलेड, ब्रिस्बेन, मेलबर्न आणि सिडनी येथे होणार आहेत. ६ ते १० डिसेंबरदरम्यान होणारा सामना प्रकाशझोतातील आहे. गेल्या दोन दौऱ्यात भारताने ऑस्ट्रेलियाला हरवलेले असल्यामुळे त्यांच्यासाठी ही मालिका प्रतिष्ठेची झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: पालघर आणि नाशिकसाठी रेड अलर्ट, तर मुंबईसह पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी, वाचा 26 सप्टेंबरला कशी असेल पावसाची स्थिती?

Pune Baner Road Traffic Jam: पुण्यातील बाणेर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी! कामावरुन घराकडं निघालेले पुणेकर वैतागले

Pune Rain : नरेंद्र मोदींच्या सभेच्या ठिकाणी झाले चिखलाचे साम्राज्य

IPL Auction 2025: CSK च्या ताफ्यात अश्विन आण्णाची होणार घरवापसी, तर 'लाला'चीही लागणार वर्णी?

Politics: परळीत पंकजा मुंडेंना मोठा धक्का! विश्वासू शिलेदार शरद पवारांच्या ताफ्यात, विधानसभेचं गणित बदलणार?

SCROLL FOR NEXT