Mayank Yadav and Nitish Reddy Sakal
क्रिकेट

IND vs BAN: टीम इंडियाकडून दोन युवा खेळाडूंचं पदार्पण, जाणून घ्या पहिल्या T20I साठी 'प्लेइंग-११'

India vs Bangladesh, 1st T20I Cricket Match: भारत विरुद्ध बांगलादेश संघात रविवारपासून (६ ऑक्टोबर) तीन सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात झाली असून ग्वाल्हेरला होत असलेल्या पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आहे. या सामन्यातून भारताकडून दोन खेळाडूंचे पदार्पण होत आहे.

Pranali Kodre

India vs Bangladesh, 1st T20I: भारत विरुद्ध बांगलादेश संघात रविवारपासून (६ ऑक्टोबर) तीन सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात झाली आहे. ग्वाल्हेरला होत असलेल्या पहिल्या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताकडून या सामन्यासाठी नितीश कुमार रेड्डी आणि मयंक यादव यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. त्यामुळे अष्टपैलू नितीश कुमार आणि वेगवान गोलंदाज असलेला मयंक या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार आहेत.

ते आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे ११६ आणि ११७ वे खेळाडू ठरल आहेत. या दोघांनीही आयपीएल २०२४ मध्ये प्रभावी कामगिरी केली होती. मयंकने सातत्याने ताशी १५० किमी वेगाने चेंडू टाकत सर्वांचे लक्ष वेधले होते. तसेच नितीशकडे आक्रमक खेळण्याबरोबरच गरज असेल, तर गोलंदाजी करण्याची क्षमताही आहे.

नितीशने आत्तापर्यंत २० टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३९५ धावा केल्या आहेत, ज्याच २ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने ३ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच मयंकने १४ टी२० सामने आत्तापर्यंत खेळले असून १९ विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तिलक वर्मा, रवी बिश्नोई, हर्षित राणा आणि जितेश शर्मा यांना संधी मिळालेली नाही. पण संघात सूर्यकुमारसह हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रिंकू सिंग असे अनुभव असलेले खेळाडू आहेत.

बांगलादेशने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटू असं संमिश्रण ठेवलं आहे.

भारत आणि बांगलादेश संघात आत्तापर्यंत १४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवण्यात आले आहेत. यातील १३ सामन्यात भारताने आणि एका सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकली आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

भारत: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव

बांगलादेश: लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), परवेझ हुसैन इमॉन, तौहीद ह्रदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, मेहिदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT